Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ८ - पाकिस्तानच्या-सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.
- फेब्रुवारी २३ - एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- मार्च २ - कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानुकने पदत्याग केला. त्याचे वडील नोरोदोम सुरामारित राजेपदी.
- एप्रिल २४ - बांडुंगची सभा समाप्त. २९ देशांच्या या सभेत पंचशील तत्त्वांचा पुरस्कार केला गेला.
- मे ५ - पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्त्व.
- मे ९ - पश्चिम जर्मनीला नाटोमध्ये प्रवेश.
- मे २५ - जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.
- जुलै ११ - अमेरिकेने आपल्या चलनावर इन गॉड वी ट्रस्ट (देवावर आमचा विश्वास आहे) असे मुद्रित करण्याचे ठरवले.
- जुलै २० - चीनने तैवानच्या क्वेमॉय व मात्सु बेटांवर तोफा डागल्या.
- जुलै २७ - दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातून आपले सैनिक काढून घेतले.
- फेब्रुवारी २४ - स्टीव जॉब्स, ऍपल कम्प्युटर्सचा संस्थापक.
- मे ३ - डेव्हिड हूक्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू.
- मे १० - मार्क चॅपमन, जॉन लेननचा मारेकरी.
- मे १८ - चौ युन फॅट, हॉँगकॉँगचा अभिनेता.
- जून २१ - मिशेल प्लाटिनी, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.
- जुलै १९ - रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै २७- ऍलन बॉर्डर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १ - अरूणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ४ - बिली बॉब थॉर्न्टन, अमेरिकन अभिनेता.
- सप्टेंबर ७ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर १३ - मनोहर पर्रीकर, गोव्याचे मुख्यमंत्री.
ई.स. १९५३ - ई.स. १९५४ - ई.स. १९५५ - ई.स. १९५६ - ई.स. १९५७