जून २१
Wikipedia कडून
मे – जून – जुलै | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२८ | २९ | ३० | ३१ | १ | २ | ३ |
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० | १ै |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
जून २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७२ वा किंवा लीप वर्षात १७३ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अठरावे शतक
- १७४९ - कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतात हॅलिफॅक्स शहराची स्थापना.
- १७८८ - न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे नववे राज्य झाले.
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९४० - दुसरे महायुद्ध - फ्रांसने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने टोब्रुक जिंकले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - ओकिनावाची लढाई संपली.
- १९६४ - अमेरिकेत मिसिसिपी राज्यात समान हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या ३ व्यक्तींना कु क्लुक्स क्लॅन ठार मारले.
- १९७५ - वेस्ट ईंडीझने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.
- १९८९ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
- १९९१ - भारताच्या पंतप्रधानपदी पी.व्ही.नरसिंह राव
[संपादन] एकविसावे शतक
- २००४ - स्पेसशिपवन या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण.
[संपादन] जन्म
- १००२ - पोप लिओ नववा.
- १२२६ - बोलेस्लॉस पाचवा, पोलंडचा राजा.
- १७३२ - योहान क्रिस्चियन बाख, जर्मन संगीतकार.
- १७८१ - सिमिओन-डेनिस पॉइसॉन, फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०५ - ज्यॉँ-पॉल सार्त्र, फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी.
- १९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.
- १९३७ - जॉन एडरिच, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- १९५३ - बेनझीर भुट्टो, पाकिस्तानची पंतप्रधान.
- १९५४ - जेरेमी कोनी, न्यू झीलँडचा क्रिकेटपटू.
- १९५५ - मिशेल प्लाटिनी, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.
- १९८२ - विल्यम, ईंग्लिश राजकुमार.
[संपादन] मृत्यू
- १३०५ - वेंकेस्लॉस दुसरा, पोलंडचा राजा.
- १३७७ - एडवर्ड तिसरा, ईंग्लंडचा राजा.
- १५२७ - निकोलो माकियाव्हेली, इटलीचा राजकारणी, इतिहासकार.
- १८७४ - अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम, स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९३ - लिलँड स्टॅनफोर्ड, अमेरिकन उद्योगपती; स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
- १९२८ - नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे, मराठी कादंबरीकार.
- १९५७ - योहान्स स्टार्क, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९७० - सुकर्णो, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८४ - अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता.
- १९८५ - टेग अर्लँडर, स्वीडनचा पंतप्रधान.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.
- दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस.
- स्थानिक रहिवासी दिन - कॅनडा.
- राष्ट्र दिन - ग्रीनलँड.