देअर श्पीगल
Wikipedia कडून
देअर श्पीगल (अर्थ: 'आरसा') हे युरोपातील सर्वाधिक खपाचे आणि जर्मनीतील एक प्रभावशाली साप्ताहिक आहे. जर्मनीतील हांबुर्ग शहरातून प्रसिध्द होणार्या या साप्ताहिकाच्या आठवड्याला साधारणत: ११ लाख प्रती वितरित होतात.
पहिल्या महायुध्दापूर्वी नोव्हेंबर १९०८ मध्ये लिओन फोयष्टवागनर यांनी 'देअर श्पीगल' नावाचे एक पत्रक म्युनिकमधून प्रसिध्द केले. श्पीगलचे पहिले प्रकाशन जानेवारी ४, १९४७ साली हानोवर मधून प्रसिध्द झाले. श्पीगलच्या पहिल्या प्रकाशनापासून रुडोल्फ आउगस्टाइन यांनी त्यांच्या मृत्युपर्यंत (नोव्हेंबर ७, २००२) या साप्ताहिकाचे प्रमुख संपादक म्हणून काम केले.
[संपादन] बाह्य दुवे
- Spiegel.de साप्ताहिकाचे संकेतस्थळ