इल्या रेपिन
Wikipedia कडून
इल्या रेपिन | |
![]() रेपिनने काढलेले आत्मव्यक्तिचित्र (१८७८) |
|
पूर्ण नाव | इल्या एफिमोविच रेपिन |
जन्म | ऑगस्ट ५, १८४४ चुगुएव्ह, युक्रेन |
मृत्यू | सप्टेंबर २९, १९३० कुओक्काला, फिनलंड |
राष्ट्रीयत्व | रशियन ![]() |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
इल्या रेपिन (रशियन: Илья́ Ефи́мович Ре́пин) (जीवनकाल:ऑगस्ट ५, १८४४:चुगुएव्ह, युक्रेन - सप्टेंबर २९, १९३०) हा नामवंत रशियन चित्रकार व चित्रकार होता. रेपिनची चित्रे वास्तववादी ढंगातील असून त्यात तत्कालीन रशियन समाजव्यवस्थेचे, घडामोडींचे चित्रण दिसते.
[संपादन] जीवन
इल्या रेपिनचा जन्म ऑगस्ट ५, १८४४ रोजी स्लोबोदा युक्रेन परिसरातील खार्कोव्ह शहरानजीक 'चुगुएव्ह' नावाच्या गावात झाला. तरूणवयात रेपिनने 'बुनाकोव्ह' नावाच्या स्थानिक चित्रकाराकडे उमेदवारी करत चित्रकलेचा, विशेषकरून व्यक्तिचित्रणाचा अभ्यास केला. १८६६ मध्ये तो सेंट पीटर्सबर्गला गेला व त्याला तेथील 'इंपिरियल अकॅडमी ऑफ आर्ट्स' या सुविख्यात कलाशिक्षणसंस्थेत प्रवेश मिळाला. १८७३ - १८७६ या कालखंडात संस्थेने दिलेल्या भत्त्यावर त्याने इटली, पॅरिस या ठिकाणांचा अभ्यासदौरा केला. पॅरिसमध्ये असताना तिथे नव्याने सुरु झालेल्या दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीशी('इंप्रेशनिझम'शी) त्याची ओळख झाली. दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीतील प्रकाशाच्या चित्रणाचा प्रभाव पडला तरीही रेपिनची शैली मात्र युरोपातील वास्तववादी चित्रपरंपरेशी नाते सांगणारीच राहिली. आपल्या चित्रांमधून रेपिनने सर्वसामान्य माणसांच्या - विशेषत्वाने ग्रामीण लोकांच्या - भावनांचे, क्रिया-प्रतिक्रियांचे चित्रण केले. याखेरीज उत्तरायुष्यात त्याने रंगविलेली रशियन विद्वज्जनांची, अधिकार्यांची, रशियन राजघराण्यातील व्यक्तींची चित्रेही उपलब्ध आहेत.