ई.स. १९८६
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ७ - हैतीच्या हुकुमशहा ज्यॉँ क्लॉड डुव्हालियरने देशातून पळ काढला.
- फेब्रुवारी ९ - हॅलेचा धूमकेतु सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.
- फेब्रुवारी २८ - स्वीडनचा पंतप्रधान ओलोफ पाल्मेची हत्या.
- एप्रिल १४ - अमेरिकेच्या लढाउ विमानांनी लिब्याच्या बेंगाझी व ट्रिपोली शहरांवर हल्ला केला. ६० ठार.
- एप्रिल १४ - बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजुन अबाधित आहे.
- एप्रिल १७ - सिसिली आणी नेदरलँड्समधील युद्ध ३३५ वर्षांनी अधिकृतरीत्या संपले.
- एप्रिल २५ - म्स्वाती तिसरा स्वाझीलँडच्या राजेपदी.
- एप्रिल २६ - युक्रेनमध्ये चर्नोबिल अणु भट्टीत अपघात. घातक किरणोत्सर्गाने युरोप, एशियातील अनेक देश प्रभावित.
- जून ८ - कर्ट वाल्धेम ऑस्ट्रियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जून २२ - मेक्सिकोच्या डियेगो माराडोनाने ईंग्लंडविरुद्ध हँड ऑफ गॉड व गोल ऑफ द सेन्चुरी नावाने प्रख्यात झालेले गोल नोंदवून विजय मिळवला.
- जून २९ - आर्जेन्टीनाने १९८६चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
- डिसेंबर २७ - अफगाणिस्तानमध्ये तालिबानने बाग्रामचा विमानतळ काबीज केला.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- फेब्रुवारी २८ - ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.
- मे ९ - तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस.
- मे १८ - कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.
- जुलै ६ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी.
- ऑगस्ट ३१ - उर्हो केक्कोनेन फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.