एप्रिल २६
Wikipedia कडून
एप्रिल २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११५ वा किंवा लीप वर्षात ११६ वा दिवस असतो.
मार्च – एप्रिल – मे | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
- १४७८ - इटलीतील पाझींनी फ्लोरेन्समध्ये चर्चमधील रविवारच्या सामूहिक प्रार्थने दरम्यान लॉरेन्झो दि मेदिची वर हल्ला केला. लॉरेन्झोचा भाउ ज्युलियानी मृत्युमुखी पडला.
[संपादन] सतरावे शतक
- १६०७ - ईंग्लंडचे काही वसाहती केप हेन्री, व्हर्जिनीया येथे पोचले. यांनी पुढे जेम्सटाउन शहर वसवले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०२ - नेपोलियन बोनापार्टने फ्रेंच क्रांतीत देशाबाहेर पळून गेलेल्या जहागिरदारांना माफी जाहीर केली व परत फ्रांसमध्ये बोलावले.
- १८६५ - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या जनरल जोसेफ जॉन्स्टनने उत्तरेच्या विल्यम टेकुमेश शर्मन समोर उत्तर कॅरोलिनातील ड्युरॅम येथे शरणागती पत्करली.
- १८६५ - अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.
[संपादन] विसावे शतक
- १९२५ - पॉल फोन हिंडेनबर्ग वायमार प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९३३ - जर्मनीची गुप्त पोलिस यंत्रणा गेस्टापोची रचना.
- १९३७ - जर्मनीच्या लुफ्तवाफेने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. याचे परिणाम पाहून ख्यातनाम चित्रकार पाब्लो पिकासोने गर्निका हे जगप्रसिद्ध चित्र काढले.
- १९४२ - मांचुरियाच्या हॉन्केइको कोलियरी या कोळशाच्या खाणीत स्फोट. १,५४९ कामगार ठार. आत्तापर्यंतचा खाणीत झालेला हा सगळ्यात मोठा अपघात आहे.
- १९६२ - नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
- १९६४ - टांगानिका व झांझिबार देश एकत्र आले. टांझानियाची रचना.
- १९८६ - युक्रेनमध्ये चर्नोबिल अणु भट्टीत अपघात. घातक किरणोत्सर्गाने युरोप, एशियातील अनेक देश प्रभावित.
- १९९४ - चायना एरलाईन्सचे एरबस ए-३००जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळले. २६४ ठार.
[संपादन] एकविसावे शतक
- २००२ - जर्मनीच्या एरफर्ट शहरात रॉबर्ट स्टाइनहाउझरने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलिस अधिकाऱ्याला ठार मारले.
- २००५ - २९ वर्षांनी सिरियाची लेबेनॉनमधून माघार.
[संपादन] जन्म
- १२१ - मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.
- १६४८ - पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १८९४ - रुडॉल्फ हेस, नाझी अधिकारी.
- १९०० - चार्ल्स रिश्टर, अमेरिकन भूशास्त्रज्ञ.
- १९१७ - आय.एम.पै, अमेरिकन स्थापत्यविशारद.
- १९६३ - जेट ली, चीनी अभिनेता.
[संपादन] मृत्यू
- ११९२ - गो-शिराकावा, जपानी सम्राट.
- १४८९ - अशिकागा योशिहिसा, जपानी शोगन.
- १९२० - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.
- १९३२ - विल्यम लॉकवुड, ईंग्लिश क्रिकेटपटू.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- एकत्रीकरण दिन - टांझानिया.
एप्रिल २४ - एप्रिल २५ - एप्रिल २६ - एप्रिल २७ - एप्रिल २८ - (एप्रिल महिना)