जानेवारी ४
Wikipedia कडून
डिसेंबर – जानेवारी – फेब्रुवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
जानेवारी ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४ वा किंवा लीप वर्षात ४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] नववे शतक
- ८७१ - रीडिंगची लढाई - वेसेक्सचा एथेलरेड डेन्मार्कच्या आक्रमकांकडून पराभूत[१].
[संपादन] पंधरावे शतक
- १४९३ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या पहिल्या सफरीच्या अंती नव्या जगातून परत निघाला.
[संपादन] सतरावे शतक
- १६४२ - इंग्लिश गृहयुद्ध - चार्ल्स पहिल्याने ब्रिटीश संसदेवर हल्ला केला.
[संपादन] अठरावे शतक
- १७१७ - नेदरलँड्स, ईंग्लंड व फ्रांसने तिहेरी तह केला.
- १७६२ - ईंग्लंडने स्पेन व नेपल्स विरूद्ध युद्ध पुकारले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८४७ - सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्होल्व्हर पिस्तुल विकले.
- १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.
- १८९६ - युटाह अमेरिकेचे ४५वे राज्य झाले.
[संपादन] विसावे शतक
- १९४८ - म्यानमार(तत्कालीन बर्मा)ला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य.
- १९५१ - कोरियन युद्ध - चीन व उत्तर कोरियाच्या सैन्याने सेउल काबीज केले.
- १९५८ - स्पुतनिक १, पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.
- १९५९ - रशियाचे अंतराळयान, लुना १, चंद्राच्या जवळ पोचले.
- १९६२ - न्यूयॉर्कमध्ये चालकरहित रेल्वे सुरू झाली.
- १९७४ - अमेरिकन सेनेटच्या वॉटरगेट समितीने मागितलेली कागदपत्रे देण्यास अध्यक्ष रिचर्ड निक्सनने नकार दिला.
- १९८९ - अमेरिकन नौदलाच्या २ एफ.१४टॉमकॅट विमानांनी लिब्याची २ मिग २३ फ्लॉगर विमाने पाडली.
- १९९० - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात प्रवासी रेल्वे थाबलेल्या मालगाडीवर आदळली. ३०० ठार.
- १९९९ - पाकिस्तानची राजधानी ईस्लामाबादमध्ये एका शिया मशीदीवर नमाज दरम्यान गोळीबार. १६ ठार, २५ जखमी.
[संपादन] एकविसावे शतक
- २००४ - मिखाइल साकाश्विली जॉर्जियाच्या अध्यक्षपदी.
- २००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.
[संपादन] जन्म
- १०७७ - झ्हेझॉँग, सॉंग वंशाचा चीनी सम्राट.
- १६४३ - सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
- १८४८ - कात्सुरा तारो, जपानी पंतप्रधान.
- १९०० - जेम्स बॉंड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ.
- १९०९ - प्रभाकर पाध्ये, मराठी नवसाहित्यिक.
- १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री.
- १९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४० - श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार.
- १९५३ - जॉर्ज टेनेट, अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा, सी.आय.एचा निदेशक.
[संपादन] मृत्यु
- १२४८ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १५६४ - होसोकावा उजित्सुना, जपानी सेनापती.
- १६९५ - फ्रांस्वा हेन्रि दि मोंतमोरेंसी-बुतेव्हिल, फ्रांसचा सेनापती.
- १८३१ - जेम्स मन्रो, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
- १८७७ - कोर्नेलियस व्हान्डरबिल्ट, अमेरिकन उद्योगपती.
- १९६५ - टी.एस.इलियट, अमेरिकन साहित्यिक.
- २००६ - मक्तूम बिन रशीद अल् मक्तूम, दुबईचा शेख वसंयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन
[संपादन] संदर्भ
जानेवारी २ - जानेवारी ३ - जानेवारी ४ - जानेवारी ५ - जानेवारी ६ - (जानेवारी महिना)