मराठा साम्राज्य
Wikipedia कडून
मराठा साम्राज्य शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील थोडा मराठी भाग तोडून घेऊन स्थापले. शिवाजींनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. इ.स. १६८० शिवाजींच्या मृत्यूनंतर काही काळ अस्थैर्य माजले जे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संपले. यानंतर जरी शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी प्रधानमंत्री असलेल्या पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सुत्रे गेली. पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी पानिपतच्या तिसर्या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव आंग्लांबरोबरील तिसर्या लढाईत पराभूत झाला.
अनुक्रमणिका |
[संपादन] शिवाजीचा शासनकाल
देशावर सातार्याजवळ राहणार्या हिंदू मराठ्यांनी मुघलांना याभागापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. त्यांनी शिवाजीच्या नेतृत्वाखाली स्वतःला विजापूरच्या मुस्लिम सुलतानांपासून स्वतत्र करून घेतले. यानंतर ते अधिक आक्रमक झाले व उत्तरेमध्ये बर्याच चढाया करून त्यांनी राज्याचा विस्तार केला. इ.स. १६७४ मध्ये शिवाजीला राजा घोषित करण्यात आले. शिवाजीच्या मृत्यूपर्यंत मराठ्यांनी संपूर्ण मध्य भारत काबीज केला होता.
[संपादन] शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी
१६८१ मध्ये महाराजांचे मुलगा संभाजी राजा बनला आणि त्याने वडिलांची विस्तार करण्याची नीती चालू ठेवली. राजपुत-मराठा एकी होऊ नये आणि दख्खनातील सुलतानांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब आपल्या साऱ्या राजदरबाराला आणि १,८०,००० सैन्याला घेऊन दक्षिणेला आला. त्याने विजापूर आणि गोवळकोंडा हया सल्तनती जिंकून घेतल्या. १६८८ मध्ये संभाजी पकडला गेला. त्याचा प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
संभाजीचा बंधू राजाराम हा नंतर राजा बनला. १७०० मध्ये सातारला मुघलांचा वेढा पडला आणि मुघलांनी ते काबिज केले. याच काळात राजारामाचा सिंहगडावर मृत्यू झाला आणि त्याची पत्नी ताराबाई हीने त्यांचा मुलगा संभाजी दुसरा याच्या नावाने राज्यकारभार हातात घेतला. तिने युद्धविरामाचा प्रस्ताव दिला पण बादशाह तयार झाला नाही. त्याच वर्षी मराठे नर्मदेच्या पार पोचले. माळव्याच्या मराठ्यांनी केलेला नवीन हल्ला आणि हैद्राबादमध्ये केलेली लूट यामुळे बादशाह वैतागला. दोन दशके चाललेले दक्षिणेचे युद्ध त्याच्या खजिन्यावर ताण देत होते. १७०५ मध्ये औरंगजेब आजारी पडला आणि दोन वर्षांनी मरण पावला.
बादशहाच्या मृत्यूनंतर शाहूजी जो संभाजीचा पुत्र(शिवाजीचा नातू) होता त्याला बहादुरशाहने सोडले. त्याने आपली काकू ताराराणी आणि तिचा पुत्र संभाजी दुसरा याच्याशी बंड पुकारले. त्यामुळे मुघल-मराठा युद्ध आता त्रिकोणी बनले. यानंतर थोडा काळ अराजकता माजली. शेवटी बाळाजी विश्वनाथ याला हाताशी घेऊन आणि मराठा नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे याची मदत घेऊन शाहूजीने निर्विवाद मराठा नेतृत्व मिळविले. बाळाजी आता मुख्यमंत्री(पेशवा) बनला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांची मुघलांबरोबरची लढाई संपुष्टात आली. यानंतर मुघल साम्राज्य कधीच उभारू शकले नाही आणि मराठा साम्राज्य भारतातील सर्वात शक्तिशाली राज्य बनले.
१७१३ मध्ये फारूख्सियार मुघल बादशाह बनला. त्याची सत्ता दोन भावांच्या सामर्थ्यावर टिकून होती जे सय्यद बंधू म्हणून ओळखले जात होते. ते अलाहाबाद आणि पटणा येथील राज्यपाल होते. पण बादशही बरोबर यांचे पटले नाही. पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि सय्यद बंधू यांच्यातील वाटाघाटीनुसार मराठे बादशाहविरूद्धच्या लढाईत सामिल झाले. या वाटाघाटीनुसार मराठ्यांना दक्षिणेत मुघल सत्ता मान्य करावी लागली शिवाय सैन्य व आर्थिक मदतही करावी लागली. याबदल्यात त्यांना एक फर्मान मिळाले ज्यानुसार त्यांना मराठी मातीवर स्वातंत्र्य आणि गुजरात, माळवा इत्यादी सहा वतनांवरील महसुलाचे हक्क मिळाले.
ते १७३५ मध्ये राजस्थानात, १७३७ मध्ये दिल्ली आणि १७४० मध्ये बंगालपर्यंत पोहचले. पण मराठी राज्य अजुनी सैल पद्धतीनेच बांधले होते. दख्खनमध्ये जमा झालेल्या महसुलाचे विभाजन मराठा सरदारांच्यात केल्याने एकी निर्माण झाली. मराठा राज्य आता 'confederacy' बनले. मराठ्यांच्या अधिपत्याखालिल भागांची विभागणी ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, माळव्याचे होळकर यांच्यात करणयात आली. आणि ते मराठी साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. ताराबाईला बेरारचे महसुल हक्क देण्यात आले आणि नागपूर ही तिची राजधानी बनली.
बाजीराव १७४० मध्ये वारला तोपर्यंत त्याने मराठी साम्राज्य व्यवस्थीत संगठीत केले होते. शाहूजीने त्याचा मुलगा नानासाहेबला पेशवा केले आणि त्याने शेती, सुव्यवस्था आणि बाजारपेठ यांमध्ये सुधारणा केली. याच वेळी त्याचा भाऊ रघुनाथराव राज्य विस्तार करत पंजाबपर्यंत पोचला. दिल्ली तसेच लाहोरमध्ये मराठे महत्वाचे राज्यकर्ते बनले. १७६० मध्ये निजामाच्या पराभवानंतर मराठी साम्राज्य कळसाला जाऊन पोहचले.
[संपादन] साम्राज्याची घसरण
मुघल सत्ता ढासळत असताना इ.स. १७५६-इ.स. १७५७ मध्ये अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दाली याने दिल्ली ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात जानेवारी १३, इ.स. १७६१ या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणुन ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली.
१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. इ.स. १७७५ मध्ये ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीबरोबर पहिले युद्ध लढण्यात आले. पण त्यातून दोन्ही बाजूंना काहिही मिळाले नाही. इ.स. १८०२ मध्ये इंग्रजांनी बडोद्याच्या वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणुन मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात (इ.स. १८०३-इ.स. १८०५) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण ओरिसा, गुजरात इत्यादी भाग गमवावे लागले. तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात (इ.स. १८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणुन सामिल झाले.
[संपादन] मराठ्यांचे राज्यकर्ते
[संपादन] शिवाजींचे राजघराणे
- शिवाजी महाराज
- संभाजी
- राजाराम
- शाहूजी
[संपादन] पेशवे
- बाळाजी विश्वनाथ
- बाजीराव बाळाजी (थोरले बाजीराव पेशवे)
- नानासाहेब पेशवे
- माधवराव पेशवे