महाराष्ट्र पर्यटन
Wikipedia कडून
महाराष्ट्र भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, व्यापारी अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगले लोहमार्ग, पक्क्या सडका, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतीगृहे, धर्मशाळा यांची इथे रेलचेल आहे.
[संपादन] जिल्हा
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पर्यटनस्थळे खालील प्रमाणे.
[संपादन] अहमदनगर
[संपादन] अकोला
[संपादन] अमरावती
चिखलदरा, मेळघाट हा भाग वनश्रीने नटलेला आहे. महाराष्ट्राच्या मोजक्या अभयारण्यापैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने आखलेला आहे. सिमाडोह ह्या अमरावती जिल्ह्यातल्या ठिकाणी वनखात्याची राहण्याची सोय आहे. त्यासाठी पूर्व कल्पना देऊन आरक्षण करावे लागते. झोपडी (कॉटेज) हा प्रकार अत्यंत स्वस्त असून (३५/- रु. प्र.दि.) जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था असून पूर्ण जंगलातले वातावरण अनुभवायला हे एक उत्तम ठिकाण आहे. वन्य प्राण्यांशी संबंधित वस्तू संग्रहालय तेथे असून रात्री व्याघ्र जीवनावरचा लघुपट १६ मी.मी. चलचित्र पडद्यावर दाखवला जातो. चिखलदराच्या पायथ्याशी असलेल्या सिमाडोह ला जाण्यासाठी स्वतःचे वाहन असणे नेहमी चांगले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवाराच आहे. वाहन शक्यतो चारचाकी असल्यास आत खोलवर जंगलात जाता येते. वन्यजीव निरीक्षणाचा सर्वात उत्कृष्ट काळ म्हणजे एप्रिल व मे महिना (हे तेथे डिसेंबरमध्ये गेलो तेंव्हा कळले!) ह्या काळात पाण्याची वानवा असल्याने वनखाते संरक्षित जीवांसाठी कृत्रिम पाणवठे उपलब्ध करतात. जेथे थोड्या प्रतीक्षा काळातच अनेक वन्यजीव बघता येतात. जागोजागी मचाणे बांधून पर्यटकांची सोय करण्यात आलेली आहे. वन्यजीव बघायला जाताना शक्यतो लहान मुलांना नेऊ नये - हा माझा अनुभव आहे. एकतर ती गप्प बसत नाहीत, लवकर कंटाळतात व सारखी 'केंव्हा येणार.. केंव्हा दिसणार' चा घोष लावतात. तरस, नीलगाय सारखे काही प्राणी बघायला मिळाले परंतु थंडीच्या काळात गेल्याने फारसे प्राणी बघता आले नाही. चिखलदरा येथेही राहण्याची उत्कृष्ट सोय आहे. मात्र मी सिमाडोह येथे राहिल्याने मी तेथली चौकशी केली नाही. चिखलदरा ह्या थंड हवेच्या ठिकाणी वन्यप्राणीविषयक वस्तुसंग्रहालय खास बघण्यालायक आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाचे (MTDC) वास्तव्य स्थान उत्कृष्ट ठिकाणी निवडलेले असून पक्षी निरीक्षणाचा आनंद उपभोगता येतो. ४ दिवस ह्या दोन ठिकाणांसाठी कमी पडतात परंतु वर्हाडातली इतर प्रेक्षणीय स्थळे बघायची असल्यास रविवार ते रविवार असा कार्यक्रम आखल्यास उत्कृष्टच! येथे किंवा कुठल्याही पर्यटन स्थळाला भेट देण्यापूर्वी तेथल्या व आजूबाजूच्या स्थळांची नेहमी चौकशी करणे तसेच उपलब्ध असल्यास माहितीपत्रक मिळवणे आवश्यक असते.
[संपादन] औरंगाबाद
औरंगाबाद ला मुक्काम करुन वेरुळ, अजिंठा, बीबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला तसेच घृष्णेश्वर मंदिर, पैठणचे एकनाथ महाराजांचे मंदिर, पैठण धरण, वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर बनवलेले पैठण येथील नाथ उद्यान. तसेच जवळच असलेले आणि हळूहळू प्रसिद्ध होत असलेले म्हैसमाळचे हिलस्टेशन आणि तेथील बालाजीचे मंदिर.
[संपादन] वांद्रे उपनगर (सबअर्बन)
वांद्रे हे मुंबईचे उपनगर (ज्याला Bombay असे ही म्हटले जाते.) हे रेल्वे स्टेशनचे माहेर समजले जाते. हे मुंबईतील सर्वात जास्त केथलीकांची वस्ती असलेला भाग आहे. वांद्रे हे चर्च साठी प्रसिध आहे. माउंट मेरीचे बासीलीका पुतळा हे येथील खास आकर्षन आहे. वांद्रे हे मार्केटींग साठी व फ़िरण्यासाठी लिकिंग रोड हे पर्यट्कांचे मुख्य आकर्षन आहे. काही वर्षापासुन वांद्रे हे मुंबई "रेस्टोरंट उपनगर" म्हणुन ओळखले जात आहे.
[संपादन] बीड
[संपादन] भंडारा
[संपादन] बुलढाणा
[संपादन] चंद्रपूर
चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर, अंचलेश्वर आणि गोंड राजांचे समाधीस्थळ ही प्रसिद्ध स्थळे. एक अप्रसिद्ध परंतू अतिशय सुंदर शिल्पकलेने नटलेले लहानसे शिवमंदिर बाजाराजवळ एका गल्लीत आहे. http://www.rajendrapradhan.com/photo/markanda.htm येथे तुम्हाला ह्या स्थळांची छायाचित्रे बघता येतील.ह्याशिवाय चंद्रपुरातील एक अप्रसिद्ध परंतू आवर्जून बघण्यासारखे स्थळ म्हणजे रायप्पा कोमटी ह्यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बांधकाम सुरू केलेले पण अपूर्ण राहिलेले मंदिरस्थळ. येथे महाकाय मूर्ती ऊन्ह, धूळ आणि पावसाचा मारा सहन करीत उघड्यावर पडून आहेत. जवळपास तीस फूट उंचीच्या नवमुखी दूर्गेच्या मूर्तीला रावण समजून दसऱ्याच्या दिवशी लोक दगड मारीत. त्यामुळे मूर्तीला क्षति पोचली आहे. ह्याशिवाय महाकाय आकारच्या गणपती, वराह, मत्स्य आणि इतर मूर्ती तिथे आहेत.
[संपादन] धुळे
[संपादन] गडचिरोली
[संपादन] गोंदिया
[संपादन] हिगोली
येथून २० कि.मी. अंतरावर औंढा तालुकया मध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकि आठवे ज्योतिर्लिंग "नागनाथ" चे पांडवकालिन मंदिर आहे. हे मंदिर सुमारे ५५०० वर्षांपूर्वीचे असून औरंगजेब राजाने हल्ला करून बरीच नासधूस केली. शिवभक्त अहिल्याबाई होळ्करांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
[संपादन] जळगांव
[संपादन] जालना
[संपादन] कोल्हापूर
कोल्हापूर चा पन्हाळा व जोतीबा डोंगर ! पाहण्या सारखा आहे.. जवळच विशाळगड आहे.... कोल्हापूर मध्ये भवानी मंदिर-रंकाळा-टाऊन हॉल- व महालक्ष्मी मंदिर अत्यंत सुंदर आहे. जवळच शाहू महाराजांचे पाणतळ आहे.. पूर्वी तेथे घोडांचा पागेखाना होता.. आता आता ही तेथे घोडे असायचे .... कत्यानी मंदिर !! बीनखांबी गणेश मंदिर पण पाहण्या सारखे हे ! ...... व शेवटी पंचगंगेचा काठ व ते शिव मंदिर.
[संपादन] लातूर
[संपादन] मुंबई
[संपादन] नागपूर
[संपादन] नांदेड
नांदेडहे मराठवाड्यातले क्र. २ चे शहर गोदावरीनदीच्या तीरावर वसले आहे.शीख पंथाचे दहावे गुरू, गुरू गोबिंदसिंग, यांचा शेवट नांदेड शहरी झाला. म्हणून येथील गुरुद्वाराला विषेश महत्त्व आहे. शीख पंथातील चार मुख्य (अमृतसर, ग्वाल्हेर,नांदेडहे आणि अजून एक ?) पैकि हे गुरूद्वार आहे.
[संपादन] नंदुरबार
[संपादन] नाशिक
[संपादन] उस्मानाबाद
[संपादन] परभणी
[संपादन] पुणे
[संपादन] सिंहगड
पुण्यापासून अंदाजे ३०-३५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला नावाप्रमाणेच भक्कमआहे. तानाजी मालुसरे यांच्या सिंहाच्या तुलनेतील कामगिरीमूळे मुळच्या कोंढाणा किल्ल्याचे नाव 'सिंहगड' झाले. गडावरील देव टाके थंड आणी गोड पाण्यासाठी प्रसिध्द आहे. गडावर राजाराम महाराज यांची समाधी आणी तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे. शिवाय दुरदर्शन - मुंबई चा मनोरा, लो. टिळक आणी ग.दि मा यांचे बंगले सुध्दा आहेत.
[संपादन] भुलेश्वर
पुण्यापासून अंदाजे ५०कि.मी. वर भुलेश्वर हे देवस्थान आहे. माहितीनूसार हे पांडवकालीन असून मूर्तिकाम पाहण्यासारखे आहे. लढाईच्या काळात ब-याच मूर्त्याची तोडफ़ोड करण्यात आली. माझ्या आयुष्यातील [आतापर्यंतच्या,] स्त्री रुपातील गणपतीची मुर्ती मी पहिल्यांदाच या मंदिरात पाहिली.गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पुजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. [लढाईचाच परिणाम] पिंडीवरील खोलगट भागात मिठाई किंवा पेढा ठेवल्यास तो खाल्ल्याचा आवाज ऐकू येतो. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे.
[संपादन] कार्ला लेणी
पुण्यापासून अंदाजे ४० कि.मी. वर कार्ल्याची प्रसिध्द लेणी आहेत. माझ्या वाचनानूसार ही लेणी २००० वर्षे जूणी आहेत. ही बौद्ध लेणी म्हणजे स्थापत्यशास्त्राचे एक अप्रतिम उदाहरण आहे. तेथेच एकविरा देवीचे मंदिरही आहे. देवीची मूर्ती अतिशय कोरीव असून डोळे अगदी जिवंत वाटतात.
[संपादन] भाजा लेणी
कार्ल्याच्या अगदी विरुध्द दिशेला ही भाजा लेणी आहेत.
[संपादन] बेडसा लेणी
अंदाजे कार्ल्याच्या दक्षिणेस १० कि.मी. वरती, कामशेत रेल्वे स्टेशन जवळ, बेडसे हे छोटे गाव आहे. येतील लेणी आकाराने छोटी आहेत मात्र आकर्षक आहेत.
[संपादन] तुळापूर
पुण्यापासून अगदी,३५ - ४० किमी. अंतर असेल. अ. नगर रस्त्यावर, वाघोली नंतर, एक फ़ाटा,डाव्या हाताला वळतो. काही अंतरावरच तुळापूर आहे. अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे. श्री. संभाजी महाराजांची समाधी आणि शिवमंदिर बघण्यासारखे. [ सुमारे १२०० वर्षे ] शिवाय, नावेतून फ़िरता सुध्दा येते. ३ नद्यांचा संगम आहे.
[संपादन] भंडारा डोंगर
चाकण पासुन उजव्या बाजूला जाणारा रस्ता भंडारा डोंगराला जातो... महान संत तुकाराम यांनी आपले लिखाण याच ठिकाणी केले... सोबत तुकाराम मंदिर - गाथा मंदिर असे बरेच काही पाहण्यासारखे आहे.
[संपादन] कानिफनाथ मंदिर
पुण्यापासून अंदाजे १ तासाच्या अंतरावर श्री कानिफनाथ मंदिर आहे. मुख्य समाधी ठीकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे. बापदेव घाट पार करुन वरती मंदिरापर्यंत जाता येते. रविवारी सकाळी आरती व प्रसाद वाटप होते. मंदिराच्या गाभा-यामध्ये फक्त पुरुषांनाच प्रवेश आहे. अंगरखा/सदरा उतरवून अंदाजे २/२ मापाच्या खिडकितून आतमध्ये प्रवेश करता येतो.
[संपादन] महादजी शिंदे छत्री
वानवडी मध्ये महादजी शिंदे याची ही राजवाडावजा ईमारत आजही मोठ्या डोलात उभी आहे. मंदिराच्या बांधकामामध्ये राजस्थानी कला दिसून येते. रविवार वजा आठवडाभर येथे भेट देता येते. मंदिराच्या आतमध्ये शिंदे घराण्याच्या आजपर्यंतच्या पिढ्यांची छायाचित्रे पहायला मिळतात.
[संपादन] प्रति पंढरपूर
लोहगडाच्या पाठीमागे, पायथ्याशी प्रति पंढरपूर साकारत आहे. 'आधुनिक तुकाराम' म्हणून प्रसिध्द श्री बाबा महाराज सातारकर यांच्या प्रेरणेतून हे बांधकाम होत आहे.
[संपादन] शेकरूंसाठीचे अभयारण्य भीमाशंकर
निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील एक अद्वितीय ठिकाण आहे. अतिप्राचीन काळापासून सह्याद्रीच्या धारमाथ्यावर महामूर पाऊस पडतो आहे. भीमाशंकर हे सह्यकण्यावरच वसलेलं झाडं-वृक्ष-वेली-प्राणी-पक्षी-किडे-अभयचर-सरपटणारे अशा जैविक विविधतेने संपन्न असलेलं भीमा नदीचं उगमस्थान आहे. जे महत्त्व हिंदुस्थानात गंगा-यमुना-ब्रह्मपुत्रेला तेच महत्त्व महाराष्ट्रात गोदावरी-भीमा-कृष्णा- वैनगंगेला! इथली रमणीयता, उंची आणि पुणे-मुंबई-नाशिकला जवळ असल्याने कोणी कोणी इथे महाबळेश्वरसा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यानं इथे येणाऱ्या भाविकांना सर्व सुखसोयी देण्याचा आग्रह तर कायम धरला जातो. खरंतर पुण्यापासून अवघ्या १२० किलोमीटर अंतरावर असणारं भीमाशंकर थेट एसटी बससेवेनं जोडलेलं आहे.
[संपादन] चासकमान
पुणे-नाशिक रस्त्यावरील राजगुरुनगर मार्गे चास या गावी जाता येतं. राजगुरुनगर ते चास सहा आसनी रिक्षा किंवा जीप उपलब्ध असतात. या गावात तटबुरुजांसह एक ऐतिहासिक वाडा आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची सासुरवाड असणाऱ्या जोशी यांची ही गढी. जोशी यांच्या घरातील लाडूबाई ऊर्फ ताईसाहेब यांचा विवाह बाजीराव यांच्याशी झाला. सकलसौभाग्यसंपन्न काशीबाईसाहेब बनून त्या पेशवे कुटुंबात सामील झाल्या. त्याच जोशींचे विद्यमान वंशज या वाड्यात राहतात. अनेक ऐतिहासिक वस्तू त्यांच्याकडे आहेत. ...... चास गावात उजव्या सोंडेच्या गणपतीचे पाठक यांचे मंदिर, पाटणकरांचे लक्ष्मी-विष्णू मंदिर, लघाटे यांचे गणेश मंदिर आणि डौलदार दीपमाळ असलेलं श्री सोमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये दगडी दीपमाळा आहेत. पण या सोमेश्वर महादेवाच्या देवळातील डौलदार दीपमाळ केवळ त्या सम तीच. त्रिपुरी पौर्णिमेला इथे दीपोत्सव होतो. तेव्हा तर दीपवैभव पाहण्यासारखेच असते.
[संपादन] किकलीचे श्री भैरवनाथ मंदिर
पुणे-सातारा हा राष्ट्रीय हमरस्ता. कित्येक वेळा आपण या रस्त्यानं जा-ये केलेली असते. पुण्याहून वाई-महाबळेश्वरकडे जाताना खंबाटकी घाट उतरल्यावर भुईंज हे गाव लागतं. तिथेच डावीकडे चंदन-वंदन किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. या दोन किल्ल्यांच्या मध्ये एक रुंद खिंड आहे. दोन्ही गडमाथ्यांकडून उतरत आलेले तीन टप्पे पायऱ्यांसारखे दिसतात. किकली गावात देखण्या प्रवेशद्वाराचं, दीपमाळा असणारं, चिरेबंदी बांधणीचं एक शिवमंदिर आहे. त्याला श्री भैरवनाथ मंदिर म्हणतात. खूप कलाकुसर असणारं हे ठिकाण.
[संपादन] निघोजचे रांजणखळगे
ऐन उन्हाळ्यात कुठंही जायचं तर सुट्टीतील गर्दी, सतत येणारा घाम आणि प्रचंड उकाडा यांमुळे नकोसंच वाटतं. पण आवर्जून उन्हाळ्यातच पाहावं असं एक ठिकाण पुण्याच्या अगदी जवळच आहे. पुणे-नगर रस्त्यावरील शिरूर ओलांडलं, की घोडनदीवरचा पूल लागतो. तिथं पुणे जिल्हा संपतो. पुलापलीकडं नगर जिल्हा आहे. पुलानंतर एखाद-दीड किलोमीटर गेलं, की डावीकडं एक रस्ता फुटतो. तेथील फलकावर "निघोज २४ किलोमीटर' असं लिहिलेलं आहे. पुणे-निघोज एसटी बस इथूनच जाते. या निवांत रस्त्यानं जाताना बाजूची शेतं, डेरेदार वृक याच्यापुढे बहुधा आशिया खंडातील बसॉल्ट जातीच्या खडकांमधील सर्वांत मोठे रांजण खळगे आहेत. पण अगदी जवळ जाईपर्यंत हे असं इथं काही तरी वैशिष्ट्यपूर्ण आहे याची कल्पनाच येत नाही. नदीकाठाशी पोचलं, की रांजणाच्या आकाराचे असंख्य लहान- मोठे खळगे आणि तळाशी पाण्याचा प्रवाह दिसतो.
[संपादन] श्री पांडेश्वर मंदिर
जेजुरी- मोरगाव परिसरातील आवर्जून भेट देण्याजोगे एक ठिकाण म्हणजे जेजुरीपासून दहा किलोमीटरवरील श्री पांडेश्वर. मोरगावकडे जाणाऱ्या एसटी बस इथे येण्यासाठी उपयुक्त ठरतात. कऱ्हा नदीच्या काठी हे मंदिर आहे. या मंदिराची बांधणी खूप मोठ्या विटांनी केलेली आहे. त्यावर जाड गिलाव्याचा थर आहे. सातवाहनकालीन विटांप्रमाणे या विटा वाटतात. मात्र देवळासमोरचा दगडी मुखमंडप नंतरचा असला तरी तोही सात-आठशे वर्षांपूर्वीचा असावा. या मुखमंडपात २४ देवकोष्टे (कोनाडे) आहेत. त्यातील मूर्ती मात्र गायब झाल मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गजपृष्ठाकृती सभामंडप आहे. या सभामंडपाच्या भिंती आणि छत यावर भौमितिक रंगीत नक्षी असून त्यातच काही चित्रे व लेख आहेत. मात्र हे सारे फारच पुसट झाले आहे. भारत इतिहास संशोधक मंडळातील डॉ. गणेश गंगाधर मुजुमदार आणि डॉ. कमल चव्हाण यांनी १९७२-७३ च्या सुमारास या भित्तीचित्रांचा अभ्यास केला होता. अतिशय दुर्मिळ अशा या पुरातन भित्तीचित्रांचा निगुतीने सांभाळ करण्याची नितांत आवश्यकता आहे. महाभारत, रामायण, कृष्णलीला, शिवलीला, दशावतार हे चित्रविषय तर त्यात आहेतच. पण काही युद्धदृश्ये, शिकारीला निघालेला राजपुरुष, दोन राजपुरुषांची भेट, नृत्यसभा, प्रेमीयुगुल यांचीही चित्रे त्यात आहेत. हत्ती, घोडे, हरिण, उंट, कुत्रा, गाय, असे प्राणी, मोर, पोपट आदी पक्षी यांचेही चित्रण त्यात आहे.
[संपादन] सातवाहनांच्या स्मृती जपणारा नाणेघाट
पुण्यातून शंभर किलोमीटरवरचं जुन्नर गाठायचं आणि तेथून घाटघर किंवा अजनावळे गावी जाणारी बस पकडायची. आता जीपची सोयही उपलब्ध आहे. जुन्नर-आपटाळे-चावंड मार्गे घाटघर हा प्रवास जवळचा पण रस्ता अतिशय खराब. त्यामुळे जुन्नर-माणिकडोह मार्गे घाटघर हा लांबचा पण चांगल्या रस्त्याचा पर्याय अधिक स्वीकारार्ह. जुन्नरपासून ३२ किलोमीटर आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासून ६४ किलोमीटर अंतरावर नाणे घाटाचा अनुक्रमे माथा व पायथा आहे. नाणेघाट हा पायऱ्या-पायऱ्यांचा घाट सुमारे पाच किलोमीटर लांबीचा आहे.
[संपादन] सरदार पानसे यांची सोनोरी
आपल्या परिसरात आवर्जून जाऊन पाहावीत अशी किती तरी ठिकाणं असतात. तिथे घडलेला इतिहास, त्या ठिकाणाचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व या गोष्टी विचारात घेऊन अशा ठिकाणी गेलं तर आपल्या भेटीला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं. ........ ..... पुण्याहून सासवडपर्यंत पीएमटी बससेवा तर आहेच, पण दिवे घाटातून सासवडकडे जाणाऱ्या सोनोरी फाट्याशी उतरवणाऱ्या एसटी बसही उपयुक्त ठरतात. सासवडहून रिक्षा किंवा एसटी बसनेही सोनोरीला येता येते. थोडं पायी चालायची तयारी असेल तर सोनोरी फाटा ते सोनोरी आणि सासवड ते सोनोरी असं चालतही जाता येतं.
[संपादन] लोणी भापकरचे वराहमंदिर
भगवान विष्णूचे दशावतार सर्वांनाच परिचयाचे आहेत. त्यांपैकी श्रीराम व श्रीकृष्णाची मंदिरे भारतभर आहेत. वराहमूर्तीचे देवालय फारच क्वचित आढळते. चाकणच्या चक्रेश्वरापाशी एक भग्न वराहमूर्ती आहे. रामटेक (नागपूरजवळ) आणि खजुराहो (मध्य प्रदेश) येथेही वराह देवालये आहेत. श्री विष्णुमूर्तींमध्ये प्रभावळीत दशावतार कोरलेले असतील, तर त्यातही वराहशिल्प आढळते. मानवी शरीर आणि वराहमुख अशा नृवराहाच्या मूर्ती असतात किंवा वराह हा पशुरूपातही दाखविलेला आढळतो, त्याला ""यज्ञ वराह म्हणतात. ....... अष्टविनायकांमधील प्रसिद्ध अशा मोरगावच्या मयूरेश्वराचे दर्शन घेऊन, जवळच्या आठ-दहा किलोमीटर अंतरावरील लोणी भापकर या गावी जाता येते. गावातील लोकांना दत्तमंदिराची वाट विचारावयाची आणि या भागात यायचे. इथे एक विस्तीर्ण आणि सुबक बांधणीचे कुंड आहे. या कुंडाची उत्तर बाजू इतर बाजूंपेक्षा वेगळी आहे. तिथे वराहमंडप आहे. या आटोपशीर मंडपात पूर्वी वराहमूर्ती होती. केव्हा तरी ती स्थानभ्रष्ट झाली. सध्या ही भग्न मूर्ती याच देवळाच्या पाठीमागील शेतात पडलेली दिसते.
[संपादन] रायगड
[संपादन] किल्ले रायगड
किल्ले रायगड मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये एक खास ओळख धरुन आहे. छ. शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणी महत्व पाहुन १४व्या शतकात याला आपल्या साम्राजाची राजधानी बनवले. महाराजांचा राज्याभिषेक याच ठीकाणी झाला.
महाजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होता. गडावर जाण्यसाठी एकच मार्ग आहे. दुस-या मार्गाने गडावरुन उतरणा-या 'हिरकणीची' कथा अगदी प्रसिध्द आहे. गडावर जाण्यासाठी सध्या हवाई मार्ग [रोपवे] ची सोय आहे.
[संपादन] रायगडावरील अश्मयुगीन गुहा
पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोपवेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या बाराशे पायऱ्या चढून गेलं, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असं म्हणू लागले आहेत. ...... जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आलं, की गुहेचं एक तोंड दिसतं. या तोंडातून आत गेलं की समोर येणारं दृश्य अचंबित करणारं आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेलं, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव, पाचाड ते पाचाड खिंड येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या गुहेत सतत वाहणारा थंडगार वारा, एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचं एखादं नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्ग यात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचं जुनं वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा याचं आकर्षण इथे भेट देणाऱ्याला पडतंच पडतं.
रायगड म्हणजे दुर्गदुर्गेश्वर. महाराष्ट्राचा सर्वांत वैभवशाली किल्ला. शाळा- महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर येतात. काही जण दोरवाटेने पाळण्यात बसून जातात, तर काही हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोचतात. त्या सर्वांनी हे वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा अवश्य पाहिली पाहिजे.
[संपादन] रत्नागिरी
[संपादन] सांगली
[संपादन] सांगली
सांगली शहराचे आद्य दैवत असलेले गणपती मंदिर येथिल एक श्रद्धास्थान आहे. सांगलीचे संस्थानिक पटवर्धन राजे यांनी बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम पंचायत पद्धतीचे आहे. या मंदिराच्या सभोवती आणखी ४ मंदिरे आहेत(सुर्यनारायण, चिंतामणि...इतर दोन आठवत नाहित). मंदिरातील 'बबलू' नावाचा हत्ति प्रसिद्धच आहे. त्याच्यासाठि खास दुरदर्शनची सोय आहे. बबलूच्या 'डिस्कव्हरी' व 'ऍनिमल प्लॅनेट' या आवडत्या वाहिन्या आहेत. लहान तसाच मोठ्यांचा हि बबलू आवडता आहे. मंदिराच्या प्रबंधक समितिने केलेल्या सुधारणांमुळे मंदिराचा परिसर नयनरम्य आहे. बबलू हत्तिच्या राहण्याच्या ठिकाणाजवळ 'केंगणेश्वरी' देविचे मंदिर आहे, सांगलीतील बऱ्याच कुळांची हि कुलदेवता आहे. मंदिराच्या मालकिचे उंट, घोडे, ससे इ. प्राणिही येथे आहेत. एक बघणीय स्थळ...
[संपादन] हरिपूर
सांगलीपासून जवळच 'बागेचा गणपती' म्हणून आणखी एक गणपती मंदिर आहे. हे खरे संस्थानिकांचे पुर्विपासूनचे दैवत. येथूनच पुढे हरिपूर नावाचे छोटे गाव आहे. येथिल शिवमंदिर प्रसिद्ध आहे. श्रावण मासात दर सोमवारी येथे जत्रा भरते. वरिल तिन्हि स्थळे कृष्णेच्या काठि आहेत.
[संपादन] औदुंबर
नृसिंहवाडी, श्रीक्षेत्र औदुंबर (श्री दत्त देवस्थान ), आष्टा (श्रीरामांनी दंडकारण्यातील वास्तव्यात स्थापन केलेली आठ शिवलिंगे येथे आहेत - शिवलिंगाच्या साळुंकीवर धनुष्य-बाण कोरलेले आहेत)
[संपादन] सिंधुदुर्ग
[संपादन] सातारा
[संपादन] वडगाव (पोतनीस)
ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळ व भव्य मंदिरे पाहावयास मिळणारे वडगाव (पोतनीस) हे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात आहे. पुण्यापासून ५० किलोमीटरवर बंगळूर- सातारा रस्त्यावर हे गाव आहे. शिरवळ महाविद्यालयापासून लोहोम-मांढरदेवकडे जाणाऱ्या रस्त्यावर नायगावच्या पुढे ते येते. आजूबाजूस डोंगरकपारी आहेत. ....... म्हैसूरचे टिपू सुलतान व पेशवे यांच्या सैन्यांत श्रीरंगपट्टण येथे झालेल्या लढाईत पोतनीस यांचे काही जवान कामी आले; तसेच राक्षस भुवन येथील निजामाशी झालेल्या लढाईत पोतनीस यांचे युवक शहीद झाले. या दोन्ही लढायांत पेशव्यांना विजय मिळाला. त्या वेळी श्रीमंत माधवराव पेशव्यांनी वडगाव व आसपासच्या पाच गावांतील जमिनी इनाम वतनी दिल्या; तसेच पुणे आणि वडगावचे वाडे, मंदिरे बांधण्यास पोतनीस यांच्या पूर्वजांना मदत केली, असा इतिहास आहे.
[संपादन] वाईजवळील निसर्गरम्य धोम
पुण्याहून वाई अवघं पाऊणशे किलोमीटर. वाई शहर, मेणवली, पांडवगड, पाचगणी अशी अनेक ठिकाणं वाईजवळ आहेत. वाईपासून धोम गावापर्यंत एसटी बससेवा तर आहेच; पण सहा आसनी रिक्षा आणि टॅक्सीही मिळू शकतात. ....... महाबळेश्वरला उगम पावलेल्या कृष्णा नदीवर बलकवडी आणि धोम ही दोन धरणं बांधली गेली; त्यामुळे वाईच्या कृष्णा नदीकिनारीच्या घाटांची रयाच गेली. धोम गावी आवर्जून जाऊन पाहावं असं एक मंदिर संकुल आहे. श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर आणि शेजारचं शिवमंदिर हा समूह आवर्जून भेट देण्याजोगा. इथं कृष्णेच्या तीरावर वाळुंज म्हणजे सॅलिक्स टेट्रास्पर्माची झाडी आहे. पूर्वी या वृक्षाच्या सालींपासून सॅलिसिलिक ऍसिड काढलं जाई. त्याचा उपयोग डोकेदुखी थांबविण्यासाठी केला जाई. आता हे वेदनाशामक औषधी द्रव्य कृत्रिमरीत्या कारखान्यात तयार करतात.
[संपादन] सोलापूर
[संपादन] अक्कलकोट
अक्कलकोट स्वामी समर्थ भक्तांसाठी प्रसिध्द आहे. अक्कलकोट्ला स्वामींचे भव्य मंदिर, त्यांचा गावातील मठ प्रसिद्ध आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्त्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे.अक्कलकोटचे वैशिष्ठ म्हणजे तेथील आशियाखंडातील सर्वात मोठे असलेले शस्त्रागृह. इथे सर्व जुने परंपरागत शस्त्रांचा साठा येथील भोसले राजगृहाने प्रदर्शन स्वरूपात जतन करुन ठेवलेले आहे. वेगवेगळे खड्ग, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुर्हाडी, बंदुका, खंजीर इत्यादी इत्यादींचे वैविध्याने नटलेले प्रदर्शन पाहुन मन हरखुन जाते.
येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रह मनाला मोहवितो. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे मनाला भुरळ पाडतात. त्यानंतर शिवपुरीचे दर्शन मनाला वेगळीच दिशा देते. तेथे हवन, यज्ञ आणि सकाळ-सांयकाळी पौरोहित्याचे महत्व पटवण्यात येते.
अक्कलकोटमध्ये दोन मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा. सोयींच्या बाबतीत देवस्थानच्या भक्तनिवास थोडा उजवा आहे असे म्हणता येईल. तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठीसुद्धा सोय होते. छोटेसे उपाहारगृह, प्रशस्त खोल्या, स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहेत.
[संपादन] ठाणे
[संपादन] वर्धा
महाराष्ट्रातील वर्ध्याजवळ सेवाग्रामचे महत्व काही आगळे वेगळेच आहे. सेवाग्राम येथे खालील प्रेक्षणीय स्थळे आहेत. महात्मा गांधींनी सेवाग्राम येथे दांडीयात्रेनंतर आपला मुक्काम जवळपास १० वर्ष होता.(१९३२ ते १९४२). देशाच्या मध्यभागी असलेले भौगोलिक स्थान,त्यामुळे देशातील सर्वच कार्यकर्त्यांना भेटणे सोईचे होईल हा त्यामागील उद्द्येश होता. तेथे त्यांचा रम्य असा आश्रम आहे. बापुची कुटी, बा की कुटी, त्यांचे सचिव महादेवभाई यांची कूटी, आश्रमातील रुग्णासाठी असलेली जागा, इतरत्र असलेली प्रशस्त जागा, मोठाले वृक्ष आणि रम्य असा परीसर एकदा तरी पहावा असाच आहे. जवळच पवनार येथे विनोबांनी स्थापन केलेला ब्रह्मविद्या आश्रम आहे. तेथील वैशिष्ठ्य म्हणजे हा आश्रम पुर्णपणे स्त्रीयाच चालवतात. स्त्रीयांच्या उन्नतीसाठी त्यांनी ब्रह्मविद्याचा अभ्यास करावा असे विनोबाजींचे मत होते. तेथे राहण्याचीसुध्दा सोय आहे. विनोबा आणि गांधीविचाराचे सर्व साहित्य येथे मिळते.गांधींनी आपले पाचवे मानलेले पुत्र श्री. जमनादासजी बजाज यांचे वस्तुसंग्रहालय. हे संग्रहालय पाहतांना आपले स्वातंत्र्य चळवळीशी आपले नाते वेगळ्याच स्तरावर नेवुन प्रस्थापित करते. मगन वाडी येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे निवासस्थान आहे. तेथे सरहद्द गांधी वगैरे नेते मुक्काम करीत असत. तेथे जुनी फोर्ड गाडी ठेवलेली आहे. तिला बैलानी जोडून त्यावेळच्या नेत्यांना आणण्या नेण्यासाठी वापर करत. सरदार पटेल तिला थट्टेने ऑक्स-फोर्ड असे म्हणत. गीताई मंदिर. विनोबाजींची गीताई मोठ्या शिलाखंडावर कोरलेली आढळते. त्याची रचनाही पाहण्यासारखी आहे. आकाशातुन पाहिले तर त्या शिलाखंडाचा आकार चरख्याप्रमाणे अथवा बसलेल्या गाई प्रमाणे आढळतो.जवळच बुध्दाची एक मोठी आणि बसलेल्या अवस्थेतील मुर्तीही दिसते. तेथे अनेक परकिय पर्यटक भेट देत असतात. एका दिवसाची सेवाग्राम भेट एक आगळे वेगळे समाधान देत असते.
[संपादन] वाशिम
[संपादन] यवतमाळ
[संपादन] बाह्यदुवे
[संपादन] लिखाण
डा. बाबासाहेब आंबेडकर
प्र. के. घाणेकर