अमृता प्रीतम
Wikipedia कडून
पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री श्रीमती अमृता प्रीतम (१९१९-२००५) भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात.
अमृता प्रीतम यांचा जन्म १९१९ मध्ये गुजरांवाला, पंजाब येथे झाला. त्यांचे बालपण लाहोरमध्ये सरले , शिक्षणदेखील तिथेच झाले. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरूवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणार्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
[संपादन] प्रमुख साहित्य
- कादंबर्या: पांच बरस लंबी सड़क, पिंजर, अदालत, कोरे कागज़, उन्चास दिन, सागर और सीपियां, नागमणि, रंग का पत्ता, दिल्ली की गलियां, तेरहवां सूरज
- आत्मचरित्रे: रसीदी टिकट
- कथासंग्रह: कहानियां जो कहानियां नहीं हैं, कहानियों के आंगन में
- संस्मरण: कच्चा आंगन, एक थी सारा
- कवितासंग्रह: चुनी हुई कविताएं