Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १३ - वॉशिंग्टन डी.सी.च्या विमानतळावरून निघाल्यावर एर फ्लोरिडा फ्लाईट ९० हे बोईंग ७३७ जातीचे विमान कोसळले. रस्त्यावरील ४ सह ७८ ठार.
- फेब्रुवारी १५ - खनिजतेल काढणारे जहाज ओशन रेंजर समुद्री वादळात न्यूफाउंडलंडच्या किनाऱ्याजवळ बुडाले. ८४ ठार.
- मे २ - फॉकलंड युद्ध - युनायटेड किंग्डमच्या एच.एस.एस. कॉँकरर या पाणबुडीने आर्जेन्टिनाची युद्धनौका ए.आर.ए. जनरल बेल्ग्रानो बुडवली.
- मे २५ - फॉकलंड युद्ध - आर्जेन्टिनाने युनायटेड किंग्डमची युद्धनौका एच.एम.एस. कोव्हेन्ट्री बुडवली.
- जून ६ - इस्रायेलने लेबेनॉनवर आक्रमण केले.
- जुलै ११ - फुटबॉल विश्वकपच्या अंतिम सामन्यात इटलीने पश्चिम जर्मनीला ३-१ असे पराभूत केले.
- जुलै १८ - प्लान दि सांचेझची कत्तल - ग्वाटेमालात २६८ खेड्यातील लोकांची हत्या.
- जुलै २० - आयरिश मुक्ती सेनेने लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ८ सैनिक ठार, ४७ जखमी.
ई.स. १९८० - ई.स. १९८१ - ई.स. १९८२ - ई.स. १९८३ - ई.स. १९८४