Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ३० - व्हियेतनास युद्ध - टेटचा हल्ला सुरू.
- जानेवारी ३१ - व्हियेतकाँगने सैगोनमधील अमेरिकन राजदूतावासावर हल्ला केला.
- जानेवारी ३१ - नौरूला ऑस्ट्रेलिया पासून स्वातंत्र्य.
- फेब्रुवारी ६ - फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- फेब्रुवारी २४ - व्हियेतनाम युद्ध-टेटचा हल्ला - दक्षिण व्हियेतनामने ह्युए शहर जिंकले.
- एप्रिल ११ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिन्डन बी. जॉन्सनने ई.स. १९६८च्या नागरी हक्क कायद्यावर सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.
- एप्रिल २० - साउथ आफ्रिकन एअरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान विंडहोक शहराजवळ कोसळले. १२२ ठार.
- एप्रिल २० - पियरे ट्रुडु कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
- एप्रिल २४ - मॉरिशियसला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्त्व.
- मे २२ - अमेरिकेची परमाणुचलित पाणबुडी यु.एस.एस. स्कॉर्पियन एझोर्स बेटांजवळ ९९ खलाशी व अधिकाऱ्यांसहित बुडाली.
- मे २४ - पॅरिसमध्ये निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेथील शेरबाजाराला आग लावली.
- मे २४ - कॅनडाच्या क्विबेक सिटीतील अमेरिकन वकिलातीवर बॉम्बहल्ला.
- जून ६ - आदल्या दिवशी लागलेल्या गोळीने रॉबर्ट एफ. केनेडीचा मृत्यू.
- जून ८ - मार्टिन ल्युथर किंगच्या खूनाबद्दल जेम्स अर्ल रेला अटक.
- जुलै १० - मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- जुलै १८ - इंटेल कंपनीची स्थापना.
- ऑगस्ट १ - हसनल बोल्कियाह ब्रुनेइचा राज्याभिषेक.
- जुलै २८ - ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
ई.स. १९६६ - ई.स. १९६७ - ई.स. १९६८ - ई.स. १९६९ - ई.स. १९७०