जून ६
Wikipedia कडून
मे – जून – जुलै | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२८ | २९ | ३० | ३१ | १ | २ | ३ |
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० | १ै |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
जून ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५७ वा किंवा लीप वर्षात १५८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सोळावे शतक
[संपादन] सतरावे शतक
- १६५४ - स्वीडनची प्रोटेस्टंट राणी क्रिस्टीनाने कॅथोलिक पंथ स्वीकारला व राज्य सोडून दिले. तिच्यानंतर तिचा चुलतभाउ चार्ल्स दहावा राजा झाला.
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०९ - स्वीडनने नवीन संविधान अंगिकारले.
- १८१३ - १८१२चे युद्ध - स्टोनी क्रीकची लढाई - जॉन व्हिन्सेन्टच्या नेतृत्त्वाखाली ७०० ब्रिटीश सैनिकांनी २,००० अमेरिकन सैनिकांचा पराभव केला.
- १८४४ - लंडनमध्ये यंग मेन्स क्रिस्चियन असोसिएशन (वाय.एम.सी.ए.)ची स्थापना.
- १८५९ - ऑस्ट्रेलियात क्वीन्सलँड प्रांताची रचना.
- १८६२ - अमेरिकन गृहयुद्ध - उत्तरेने मेम्फिस, टेनेसी जिंकले.
- १८८२ - मुंबईत चक्रीवादळ. १,००,०००हून अधिक ठार.
[संपादन] विसावे शतक
- १९१२ - अलास्कातील नोव्हारुप्टा ज्वालामुखीचा उद्रेक.
- १९१८ - पहिले महायुद्ध - बेलेउ वूडची लढाई.
- १९२५ - वॉल्टर पर्सी क्राइस्लरने क्राइस्लर कॉर्पोरेशनची स्थापना केली.
- १९३३ - अमेरिकेत कॅम्डेन, न्यू जर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थियेटर सुरू.
- १९३४ - अमेरिकेत रोखे व बाजार समिती(एस.ई.सी.)ची स्थापना.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - डी डे - ऑपरेशन ऑव्हरलॉर्ड या सांकेतिक नावाने ओळखले जाणारी मोहिम सुरू. १,५५,००० दोस्त राष्ट्रांचे सैनिक नॉर्मंडी येथे समुद्रकिनाऱ्यावरून फ्रांसमध्ये घुसले.
- १९६६ - श्यामवर्णीय नागरिकांच्या नागरी हक्कांसाठी मिसिसिपीत पदयात्रा करणाऱ्या जेम्स मेरेडिथची हत्या.
- १९६८ - आदल्या दिवशी लागलेल्या गोळीने रॉबर्ट एफ. केनेडीचा मृत्यू.
- १९७१ - सोवियेत संघाने सोयुझ ११चे प्रक्षेपण केले.
- १९७१ - दुआर्ते, कॅलिफोर्निया गावाजवळ ह्यूज एरवेस्टचे डी.सी.९ व अमेरिकच्या सैन्याचे एफ.४ प्रकारच्या विमानांमध्ये हवेत टक्कर. ५० ठार.
- १९७४ - स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
- १९८१ - भारताच्या बिहार राज्यात सहार्सा शहराजवळ मध्ये बागमती नदीवरील पुलावर रेल्वे गाडी घसरली. अधिकृत २६८ ठार, ३०० गायब. अनधिकृत आकडा - १,००० ठार.
- १९८२ - इस्रायेलने लेबेनॉनवर आक्रमण केले.
- १९८४ - ऑपरेशन ब्ल्यु स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
- १९९३ - मोंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १२३६ - वेन तियानशिंग, चीनी पंतप्रधान.
- १५०२ - होआव तिसरा, पोर्तुगालचा राजा.
- १७१४ - होजे पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १८७२ - अलेक्झांड्रा, रशियाची झारिना.
- १८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.
- १९०१ - सुकर्णो, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०९ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.
- १९२९ - सुनील दत्त, भारतीय अभिनेता.
- १९३० - फ्रँक टायसन, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- १९३४ - आल्बर्ट दुसरा, बेल्जियमचा राजा.
- १९४३ - आसिफ इकबाल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५६ - ब्यॉर्न बॉर्ग, स्वीडनचा टेनिसपटू.
- १९५६ - अँडी पायक्रॉफ्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू.
- १९५७ - माईक गॅटिंग, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- १९५९ - ताहिर नक्काश, पाकिस्तानी क्रिकेटपटू.
- १९६९ - सुनील जोशी, भारतीय क्रिकेटपटू.
[संपादन] मृत्यू
- १३९३ - गो-एन्यु, जपानी सम्राट.
- १८६१ - काउंट कॅमियो बेन्सो दि कॅव्हूर, ईटलीचा पंतप्रधान.
- १८९१ - सर जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९६१ - कार्ल गुस्टाक युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ.
- १९७६ - जीन पॉल गेटी, अमेरिकन उद्योगपती.
- २००२ - शांता शेळके, मराठी कवियत्री.
- २००५ - ऍन बॅन्क्रॉफ्ट, अमेरिकन अभिनेत्री.
[संपादन] प्रतीवार्षीक पालन
- राष्ट्र दिन - स्वीडन.
- क्वीन्सलँड दिन - ऑस्ट्रेलिया.