ई.स. १९७६
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ५ - कंबोडियाने नाव बदलले. नवीन नाव काम्पुचियाचे प्रजासत्ताक.
- फेब्रुवारी २४ - क्युबाने नवीन संविधान अंगिकारले.
- मे २४ - लंडन ते वॉशिंग्टन डी.सी. ला कॉँकॉर्ड विमानाची सेवा सुरू.
- जून २२ - कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
- जून २६ - कॅनडातील टोरोंटो शहरातील सी.एन. टॉवर खुला.
- जून २९ - सेशेल्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- जुलै ३ - इस्रायेलच्या कमांडो सैनिकांनी युगांडात ओलिस असलेल्या १०५ विमानप्रवाश्यांना सोडवले.
- जुलै १० - इटलीत सेव्हेसो येथे विषारी वायुगळती. ३,००० प्राणी मृत्युमुखी. ७०,००० अजून प्राण्यांची कत्तल.
- जुलै १७ - ईंडोनेशियाने पूर्व तिमोर बळकावले.
- जुलै १७ - कॅनडातील मॉँट्रिआल शहरात एकविसावे ऑलिंपिक खेळ सुरू.
- जुलै १८ - ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
- जुलै १९ - नेपाळमध्ये सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना.
- जुलै २० - व्हायकिंग १ हे अंतराळयान मंगळावर उतरले.
- जुलै २० - व्हियेतनाम युद्ध - अमेरेकेने थायलंडमधून आपले सैनिक काढुन घेतले.
- जुलै २१ - आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या.
- जुलै २७ - जपानच्या भूतपूर्व पंतप्रधान काकुएइ तनाकाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक.
- जुलै २८ - चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ ते ८.२च्या दरम्यान तीव्रता असलेला भूकंप. २,४२,७६९ ठार, १,६४,८५१ जखमी.
- ऑगस्ट ७ - व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.
[संपादन] जन्म
- जून ८ - लिंडसे डॅव्हेनपोर्ट, अमेरिकन टेनिसपटू.
- जुलै ३ - हेन्री ओलोंगा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै १४ - जरैंट जोन्स, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै २० - देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २ - मोहम्मद झहीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर १५ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू.
- सप्टेंबर १ - क्लेर कॉनोर, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - क्रेग मॅकमिलन, न्यू झीलँडचा क्रिकेटपटू.
[संपादन] मृत्यू
- जून ६ - जीन पॉल गेटी, अमेरिकन उद्योगपती.
- ऑगस्ट १० - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.