एप्रिल १३
Wikipedia कडून
एप्रिल १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०२ वा किंवा लीप वर्षात १०३ वा दिवस असतो.
मार्च – एप्रिल – मे | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अकरावे शतक
- १०५५ - व्हिक्टर दुसरा पोपपदी.
[संपादन] बारावे शतक
- ११११ - हेन्री पाचवा, पवित्र रोमन सम्राटपदी.
[संपादन] तेरावे शतक
- १२०४ - चौथ्या क्रुसेडने कॉन्स्टेन्टिनोपल लुटले.
- १२५० - सातव्या क्रुसेडचा ईजिप्तमध्ये पराभव. फ्रांसचा राजा लुई नववा युद्धबंदी.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८२९ - ब्रिटीश संसदेने रोमन कॅथोलिक व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य दिले.
- १८४९ - हंगेरी प्रजासत्ताक झाले.
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट सम्टरचा पाडाव केला.
[संपादन] विसावे शतक
- १९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.
- १९३९ - भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.
- १९४१ - जपान व सोवियेत संघाने तटस्थतेचा तह केला.
- १९४५ - जर्मनीच्या गार्डेलजेन शहरात १,०००हून अधिक राजबंदी व युद्धबंद्यांची हत्या.
- १९७० - अपोलो १३मधील ऑक्सिजन टँकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.
- १९७४ - व्यापारी तत्त्वावर चालणारा पहिला भूस्थिर उपग्रह वेस्टार १ प्रक्षेपित.
[संपादन] एकविसावे शतक
- २००२ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझ विरुद्धचा उठाव फसला.
[संपादन] जन्म
- १७१३ - लॉर्ड फ्रेडरिक नॉर्थ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७४३ - थॉमस जेफरसन, अमेरिकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
- १८६६ - बुच कॅसिडी, अमेरिकन लुटारू.
- १८९४ - आर्थर फॅडेन, ऑस्ट्रेलियाचा तेरावा पंतप्रधान.
- १९२२ - ज्युलियस न्यरेरे, टांझानियाचा पंतप्रधान.
- १९६३ - गॅरी कास्पारोव्ह, रशियाचा बुद्धिबळपटू.
[संपादन] मृत्यू
- १६०५ - बोरिस गोडुनोव्ह, रशियाचा झार.
- १८६८ - ट्युवोड्रोस, इथियोपियाचा सम्राट.
- १९६६ - अब्दुल सलाम आरिफ, इराकचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७५ - फ्रांस्वा टोम्बालबाये, चाडचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - एप्रिल १५ - (एप्रिल महिना)