एप्रिल २५
Wikipedia कडून
एप्रिल २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११४ वा किंवा लीप वर्षात ११५ वा दिवस असतो.
मार्च – एप्रिल – मे | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सतरावे शतक
- १६०७ - ८० वर्षांचे युद्ध - नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.
[संपादन] अठरावे शतक
- १७९२ - क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत ला मार्सेलची रचना केली.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८२९ - चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.
- १८४६ - मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
- १८५९ - सुएझ कालव्याची पायाभरणी.
- १८६२ - अमेरिकन गृहयुद्ध - उत्तरेने न्यू ऑर्लिअन्स जिंकले.
- १८९८ - अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
[संपादन] विसावे शतक
- १९०१ - अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात स्वयंचलित वाहनांना नंबरप्लेट लावणे सक्तीचे केले.
- १९१५ - पहिले महायुद्ध - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडचे सैन्य तुर्कस्तानमध्ये उतरले.
- १९२६ - ईराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - मिलानमधून नाझींची हकालपट्टी.
- १९७४ - पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.
- १९८३ - अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
- १९८६ - म्स्वाती तिसरा स्वाझीलँडच्या राजेपदी.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- ३२ - मार्कस साल्व्हियस ओथो, रोमन सम्राट.
- १२१४ - लुई नववा, फ्रांसचा राजा.
- १२२८ - कॉन्राड दुसरा, जर्मनीचा राजा.
- १२८४ - एडवर्ड दुसरा, ईंग्लंडचा राजा.
- १५४५ - यी सुन शिन, कोरियन दर्यासारंग.
- १५९९ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ब्रिटीश राजकारणी, अघोषित राजा.
- १८७४ - गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक.
[संपादन] मृत्यू
- ११८५ - अंतोकु, जपानी सम्राट.
- १२९५ - सांचो चौथा, कॅस्टिलचा राजा.
- १६०५ - नरेस्वान, सयामचा राजा.
- १६४४ - चॉँगझेंग, चीनी सम्राट.
- १७४० - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.
- १८४० - सिमिओन-डेनिस पोइसॉन, फ्रेंच गणितज्ञ.
- २००५ - स्वामी रंगनाथानंद, भारतीय तत्त्वज्ञानी; अध्यक्ष, रामकृष्ण मिशन.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- ऍन्झाक दिन - ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड.
- क्रांती दिन - पोर्तुगाल.
- फेस्ता देला लिबरेझियोन (स्वातंत्र्य दिन) - इटली.
- ध्वज दिन - फेरो द्वीपसमूह, स्वाझीलँड.
एप्रिल २३ - एप्रिल २४ - एप्रिल २५ - एप्रिल २६ - एप्रिल २७ - (एप्रिल महिना)