जुलै ७
Wikipedia कडून
जून – जुलै – ऑगस्ट | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | ३१ | २७ | २८ | ३९ | ३० | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
जुलै ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८८ वा किंवा लीप वर्षात १८९ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
- १४५६ - मृत्यूच्या २५ वर्षानंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवण्यात आले.
[संपादन] सोळावे शतक
- १५४३ - फ्रांसने लक्झेम्बर्गवर आक्रमण केले.
[संपादन] सतरावे शतक
- १६६८ - ट्रिनिटी कॉलेजने सर आयझेक न्यूटनला एम.ए.ची पदवी प्रदान केली.
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०७ - तिल्सितचा तह - फ्रांस, रशिया व प्रशियातील युद्ध समाप्त.
- १८४६ - अमेरिकन सैन्याने कॅलिफोर्नियातील मॉँटेरे व येर्बा बोयना काबीज केले.
- १८५४ - कावसजी दादर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
- १८६३ - अमेरिकेत सर्वप्रथम सक्तीची सैन्यभरती. १०० डॉलर भरून मुक्ती मिळवण्याची सोय.
- १८९८ - अमेरिकेने हवाई बळकावले.
[संपादन] विसावे शतक
- १९३० - अमेरिकेत हूवर धरणाचे काम सुरू.
- १९३७ - चीन-जपान युद्ध - जपानच्या सैन्याने बैजिंगवर चढाई केली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेचे सैन्य आइसलँडमध्ये उतरले.
- १९६९ - कॅनडाने सरकारी कामकाजात फ्रेंच भाषेला ईंग्लिश भाषेच्या समान स्थान दिले.
- १९७८ - सोलोमन आयलँड्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९९४ - एडनमध्ये यमनचे एकत्रीकरण संपूर्ण.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १०५३ - शिराकावा, जपानी सम्राट.
- १११९ - सुटोकु, जपानी सम्राट.
- १८४८ - फ्रांसिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५६ - जॉर्ज हर्न, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१४ - अनिल विश्वास, भारतीय संगीतकार.
- १९१७ - फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७० - मिन पटेल, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - महेंद्रसिंग धोणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १३०४ - पोप बेनेडिक्ट अकरावा.
- १३०७ - एडवर्ड पहिला, ईंग्लंडचा राजा.
- १५७२ - सिगिस्मंड दुसरा ऑगस्टस, पोलंडचा राजा.
- १९६५ - मोशे शॅरेड, इस्रायेलचा दुसरा पंतप्रधान.
- १९६७ - विव्हियन ली, ईंग्लिश अभिनेत्री.
- १९७२ - तलाल, जॉर्डनचा राजा.
- १९९९ - एम. एल. जयसिंहा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- गुरू रिनपोचे दिन - भुतान.
- तनाबाता - जपान.
- इव्हान कपाला - रशिया, युक्रेन.
- स्वातंत्र्य दिन - सोलोमन आयलँड्स.
- सान फर्मिन उत्सव (रनिंग ऑफ द बुल्स)- स्पेन.
- शेतकरी दिन - टांझानिया.
जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - जुलै ८ - जुलै ९ - (जुलै महिना)