डेट्रॉईट
Wikipedia कडून
डेट्रॉईट (स्थानिक प्रचलित उच्चार : डीट्रॉइट) हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिशिगन राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक शहर आहे. डेट्रॉईट मिशिगनमधील 'वेन' काउंटीमध्ये आहे. 'फोर्ड','जनरल मोटर्स' तसेच 'क्रायसलर' ह्या जगप्रसिद्ध मोटार कंपन्यांची मुख्यालये डेट्रॉईट आणि त्याच्या उपनगरांत असल्याने हे शहर 'Automobile Capital of World' म्हणून ओळखले जाते. त्यामुळे डेट्रॉईट शहर हे 'मोटर सिटी' व 'मोटाऊन' ह्या नावांनादेखील ओळखले जाते.
डेट्रॉईट हे डेट्रॉईट नदीच्या काठावर असून नदीच्या पलिकडील बाजूस कॅनडातील विंडसर हे शहर आहे. लोकसंख्येनुसार डेट्रॉईट हे अमेरिकेमधील ११ वे मोठे शहर असून, २००४ जनगणनेनुसार डेट्रॉईटची लोकसंख्या अंदाजे ९००,१९८ आहे.
[संपादन] डेट्रॉईटची काही उपनगरे
१. डिअरबॉर्न
२. लिवोनिआ
३. वॉरन
४. कँटन
५. ट्रॉय