व्यास
Wikipedia कडून
वर्तुळाच्या मध्य बिंदुतून जावुन, परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणाऱ्या सरळ रेषेस व्यास म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागात दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. व्यासची लांबी त्रिज्येच्या दुप्पट असते. व्यास वर्तुळाची सर्वात मोठी ज्या आहे. एखाद्या वर्तुळात असंख्य व्यास काढता येत असले तरी सर्व व्यासांची लांबी सारखीच असते. त्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहीती मिळते.
d = व्यास , c = परिघ , A = क्षेत्रफळ
इंग्रजी प्रतिशब्द: diameter.