ई.स. १९९८
Wikipedia कडून
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] जानेवारी-जून
- फेब्रुवारी २ - फिलिपाईन्समध्ये सेबु पॅसिफिक एर चे डी.सी.९ जातीचे विमान कोसळले. १०४ ठार.
- फेब्रुवारी ७ - जपानमध्ये नागानो शहरात अठरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- फेब्रुवारी १६ - चायना एरलाईन्स फ्लाईट ६७६ हे एरबस ए३०० जातीचे विमान तैवानच्या च्यांग-काइ-शेक विमानतळाजवळ कोसळले. जमिनीवरील ६ व्यक्तिंसह २०२ ठार.
- मार्च २ - गॅलेलिओ अंतराळनिरीक्षकाने पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की गुरूच्या उपग्रह युरोपा वर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे.
- एप्रिल १२ - स्लोव्हेनियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.६ तीव्रतेचा भूकंप.
- एप्रिल २० - एअर फ्रांसचे बोईंग ७२७ जातीचे विमान कोलंबियाच्या बोगोटा विमानतळावरून उडल्यावर डोंगरावर कोसळले. ५३ ठार.
- मे ११ - भारताने राजस्थानमधील पोखरण येथे परमाणु बॉम्बची चाचणी केली.
- मे ११ - फिलिपाईन्समध्ये निवडणुका. जोसेफ एस्ट्राडा विजयी.
- मे ३० - अफगाणिस्तानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ५,००० ठार.
- जून २७ - कुआलालम्पुर विमानतळ खुला.
[संपादन] जुलै-डिसेंबर
- जुलै ५ - जपानने मंगळाकडे अंतराळयान प्रक्षेपित केले.
- जुलै १७ - रशियाच्या झार निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबीयांना सेंट पीटर्सबर्ग येथे पुनर्दफन.
- जुलै १७ - पापुआ न्यू गिनीच्या किनाऱ्यावर त्सुनामी. १,५०० मृत्युमुखी, २,००० गायब.
- जुलै १८ - पापुआ न्यू गिनीत त्सुनामीसदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.
- जुलै २० - तालिबानच्या हुकुमावरुन २०० स्वयंसेवी डॉक्टर व इतर संस्थांनी अफगाणिस्तान सोडले.
- ऑगस्ट ७ - टांझानिया व केन्यामधील अमेरिकन वकिलातींवर दहशतवाद्यांचा बॉम्बहल्ला. २२४ ठार, ४,५०० जखमी.
- डिसेंबर १६ - ऑपरेशन डेझर्ट फॉक्स - अमेरिका व युनायटेड किंग्डमने ईराकवर बॉम्बफेक केली.
- डिसेंबर २९ - ख्मेर रूजच्या नेत्यांनी कंबोडियातील वंशहत्येबद्दल जगाची माफी मागितली. या प्रकारात १०,००,०००हून अधिक माणसांना मारण्यात आले होते.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- जानेवारी ३ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी.
- मे १ - गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.
- मे २ - पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि कॉंग्रेस नेता.
- मे १० - यदुनाथ थत्ते, पत्रकार व संपादक.
- मे १९ - उनो सोसुके, जपानचे पंतप्रधान.
- जून ७ - शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.
- जून ८ - सानी अबाचा, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर २१ - फ्लोरेंस ग्रिफिथ जॉयनर, अमेरिकन धावपटू.