त्सुनामी
Wikipedia कडून
त्सुनामी मह्णजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरीत होते त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भुकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यांमुळे त्सुनामी निर्माण होवू शकतात.
त्सुनामी हा जपानी शब्द असुन त्याचा अर्थ "बंदरातील लाटा" ( त्सु 津- बंदर, नामी 波 - लाटा ) असा आहे. हा शब्द कोळ्यांच्यात प्रचलीत होता. मासेमारी करुन परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे पण समुद्रात लाटा दिसत नसत त्यामुळे हे नाव देण्यात आले. किनाऱ्यापासुन दूर समुद्रात या लाटांची उंची(amplitude) जास्त नसते पण लांबी (wavelength) जास्त असते त्यामुळे त्या दिसुन येत नाहीत.