मार्च २
Wikipedia कडून
फेब्रुवारी – मार्च – एप्रिल | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२७ | २८ | २९ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
मार्च २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६० वा किंवा लीप वर्षात ६१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८३६ - टेक्सासच्या प्रजासत्ताकने स्वतःला मेक्सिको पासून स्वतंत्र जाहीर केले.
- १८५५ - अलेक्झांडर दुसरा रशियाच्या झारपदी.
- १८६१ - झार अलेक्झांडर दुसर्याने रशियातील गुलामगिरी बंद केली.
- १८७७ - राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी सॅम्युएल जे. टिल्डनला मताधिक्य असूनही अमेरिकन कॉँग्रेसने रदरफोर्ड बी. हेसला अध्यक्षपदी बसवले. .
- १८८८ - कॉँन्स्टेन्टिनोपलचा करार स्वीकृत. ईजिप्तने युद्ध वा शांतिकालात सुएझ कालव्यातून जहाजांना सुखरूप जाउ देण्याची हमी दिली.
[संपादन] विसावे शतक
- १९१७ - रशियात झार निकोलस दुसर्याने पदत्याग केला. त्याचा भाउ मायकेल झारपदी.
- १९३९ - पायस बारावा पोपपदी.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - बिस्मार्कच्या समुद्रातील लढाई.
- १९४६ - हो ची मिन्ह व्हियेतनामच्या अध्यक्षपदी.
- १९४९ - कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
- १९५५ - कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानुकने पदत्याग केला. त्याचे वडील नोरोदोम सुरामारित राजेपदी.
- १९५६ - मोरोक्कोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६२ - म्यानमारमध्ये लश्करी उठाव.
- १९६९ - फ्रांसच्या तुलु शहरात स्वनातीत प्रवासी विमान कॉँकॉर्डची पहिली चाचणी.
- १९६९ - उस्सुरी नदीच्या काठी चीन व सोवियेत संघाच्या सैन्यात चकमक.
- १९७० - र्होडेशिया प्रजासत्ताक झाले.
- १९९१ - पहिले अखाती युद्ध - रमैलाची लढाई.
- १९९२ - उझबेकिस्तान व मोल्डाव्हियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- १९९५ - बारिंग्ज बँकच्या घोटाळ्यात निक लीसमला अटक.
- १९९६ - जॉन हॉवर्ड ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९९८ - गॅलेलिओ अंतराळनिरीक्षकाने पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की गुरूच्या उपग्रह युरोपा वर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे.
[संपादन] एकविसावे शतक
- २००४ - ईराकवरील अमेरिकन आक्रमण - अल कायदाने अशुराचा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.
- २००४ - संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की ई.स. १९९४ नंतर ईराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हती.
- २००६ - पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी.
[संपादन] जन्म
- १३१६ - रॉबर्ट दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १४५९ - पोप एड्रियान सहावा.
- १७९३ - सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १८१० - पोप लिओ तेरावा.
- १८५५ - एडमुंड पीट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७६ - पोप पायस बारावा.
- १९१२ - चुड लँग्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - डॉन टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९३१ - मिखाईल गोर्बाचेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३७ - अब्देलअझीझ बुटेफ्लिका, अल्जिरीयाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५७ - स्टु गिलेस्पी, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - जॉन बॉन जोव्ही, अमेरिकन रॉक संगीतकार.
- १९७७ - अँड्रु स्ट्रॉस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - दर्शना गमागे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - जिम ट्राउटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - मार्क व्हर्मुलेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ८५५ - लोथार, पवित्र रोमन सम्राट.
- १७३० - पोप बेनेडिक्ट तेरावा.
- १७९१ - जॉन वेस्ली, मेथोडिस्ट चर्चचा स्थापक.
- १८३५ - फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १९२१ - निकोलस पहिला, मॉँटेनिग्रोचा राजा.
- १९३० - डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
फेब्रुवारी २९ - मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - (मार्च महिना)