Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ३ - काश्मीरमध्ये सुरुंगस्फोटात १५ ठार.
- जानेवारी ३० - केन्या एरवेझ फ्लाईट ४३१ हे एरबस ए३१० जातीचे विमान कोटे द'आयव्हार जवळ अटलांटिक महासागरात कोसळले. १६९ ठार.
- मार्च ८ - टोक्योत दोन लोकल गाड्यांची टक्कर. ५ ठार.
- एप्रिल १९ - एअर फिलिपाईन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३१ ठार.
- मे २४ - इस्रायेलने २२ वर्षांनी लेबेनॉनमधून आपले सैनिक काढून घेतले.
- जुलै १० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.
- जुलै १४ - फिजीतील उठावाचा सूत्रधार जॉर्ज स्पेटला अटक व देशद्रोहाचा आरोप.
- जुलै २५ - एर फ्रांस फ्लाईट ४५९० हे कॉँकोर्ड विमान पॅरिस विमानतळावरून उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.
- जुलै २८ - आल्बेर्तो फुजिमोरी तिसऱ्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- ऑगस्ट ९ - अमेरिकेच्या बर्लिंग्टन, न्यू जर्सी शहराजवळ पायपर नवाहो व पायपर सेमिनोल प्रकारच्या विमानांची हवेत टक्कर. ११ ठार.
- डिसेंबर १२ - अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश अध्यक्षपदी.
- डिसेंबर १३ - आदल्या दिवशी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बुश वि. गोर खटल्याच्या निकालानंतर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ऍल गोरने हार मान्य केली.
- डिसेंबर २८ - एड्रियन नास्तासे रोमेनियाच्या पंतप्रधानपदी.
- डिसेंबर ३० - मनिलात काही तासात अनेक बॉम्बस्फोट. २२ ठार, १०० जखमी.
ई.स. १९९८ - ई.स. १९९९ - ई.स. २००० - ई.स. २००१ - ई.स. २००१