डिसेंबर १२
Wikipedia कडून
नोव्हेंबर – डिसेंबर – जानेवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३१ | २७ | २८ | २९ | ३० | १ | २ |
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
डिसेंबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४६ वा किंवा लीप वर्षात ३४७ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सातवे शतक
- १९१४ - निनेवेहची लढाई - हेराक्लियसच्या बायझेन्टाईन सैन्याने खुस्रो दुसऱयाच्या पर्शियन सैन्याला हरविले.
[संपादन] अकरावे शतक
- १०९८ - पहिली क्रुसेड - मा'अरात अल् नुमानची कत्तल - शहराची तटबंदी फोडून क्रुसेडर आत घुसले व २०,००० रहिवाश्यांची कत्तल उडविली. शहरात पुरेसे अन्न न मिळाल्याने त्यांनी मानवमांस खाल्ले.
[संपादन] अठरावे शतक
- १७१९ - बॉस्टन गॅझेटचे प्रकाशन.
- १७८१ - अमेरिकन क्रांति-उशान्तची दुसरी लढाई - रिअर ऍडमिरल रिचर्ड केम्पेनफेल्टच्या एच.एम.एस.व्हिक्टरी या युद्धनौकेच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटीश नौदलाच्या स्क्वॉड्रनने फ्रेंच तांड्याला हरविले.
- १७८७ - पेनसिल्व्हेनिया अमेरिकेचे संविधान मान्य करणारे दुसरे राज्य ठरले.
[संपादन] विसावे शतक
- १९०१ - न्यू फाउंडलंडमधील सेंट जॉन गावातील सिग्नल हिल येथे गुग्लियेल्मो मार्कोनीने प्रथम अटलांटिकपारचा रेडियो संदेश पकडला.
- १९११ - ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलविली.
- १९२५ - ईराणच्या मजलिसने रझा खानची शाहपदी निवड केली.
- १९३९ - हिवाळी युद्ध-तोल्वाजार्विची लढाई - फिनलंडच्या सैन्याने प्रथम सोवियेत युनियनविरूद्ध विजय मिळविला.
- १९४१ - ब्रिटनने बल्गेरियाविरूद्ध युद्ध पुकारले.
- १९६३ - केन्याला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.
- १९६४ - जोमो केन्याटा केन्याच्या अध्यक्षपदी.
- १९७९ - ऱहोडेशियाचे नामांतर. नवीन नाव झिम्बाब्वे.
- १९८५ - ऍरो एर फ्लाईट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हीजनचे २४८ सैनिक.
- १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.
- २००० - अमेरिकन सुप्रीम कोर्टने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी.
[संपादन] जन्म
- १२९८ - ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक आल्बर्ट दुसरा.
- १४१८ - ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक आल्बर्ट सहावा.
- १५७४ - डेन्मार्कची ऍन, ईंग्लंडचा राजा जेम्स पहिला याची राणी.
- १८७२ - बा. शि. मुंजे, हिंदू महासभेचे संस्थापक, लो.टिळकांचे अनुयायी
- १९४० - शरद पवार, भारतीय राजकारणी.
- १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, भारतीय अभिनेता.
- १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेटपटू.
[संपादन] मृत्यू
- ८८४ - कार्लोमान, पश्चिमी फ्रॅंक्सचा राजा.
- १५७४ - सलीम दुसरा, ऑटोमन सुलतान.
- १६८५ - जॉन पेल, ब्रिटीश गणितज्ञ.
- १८४३ - विल्यम पहिला, नेदरलँड्सचा राजा.
- १९१३ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
- १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.
- १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे जनक.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- केन्या - स्वातंत्र्य दिन.
डिसेंबर १० - डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - (डिसेंबर महिना)