Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Web Analytics
Cookie Policy Terms and Conditions अब्राहम लिंकन - विकिपीडिया

अब्राहम लिंकन

Wikipedia कडून

अब्राहम लिंकन (फेब्रुवारी १२, १८०९ - एप्रिल १५, १८६५) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा सोळावा राष्ट्राध्यक्ष होता (कार्यकाळ: १८६१ ते १८६५) तर रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असणारा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. तो अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्ष होता. लिंकन याचा गुलामगिरीची पद्धत प्रदेशांमध्ये नेण्यास विरोध होता. युद्धाच्या शेवटानंतर दक्षिणेच्या काही पाठीराख्यांच्या कटामधुन त्याची हत्या करण्यात आली.

[संपादन] जन्म व शिक्षण

अब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, १८०९ रोजी केंटकी राज्यातील हार्डीन काउंटीमधील सिंकींग स्प्रिंग फार्मवरील एका खोलीच्या लाकडी खोपट्यात झाला. हा भाग त्या काळात अमेरिकन सरहद्दीवर मानला जात असे. त्याचे नाव त्याच्या आजोबांवरून ठेवण्यात आले होते. त्याचे वडील थॉमस लिंकन व आई नॅन्सी हॅंक्स हे दोघेही अशिक्षीत व निरक्षर शेतकरी होते. जरी नंतरच्या काळात लिंकनच्या लहानपणच्या गरीबीचे व कठीण परिस्थीतीचे बरेच वर्णन झाले असले तरी वस्तुतः त्याचे वडील ते त्या भागतील श्रीमंत नागरिक होते. त्यांनी ३४८ एकराचा सिंकींग स्प्रिंग फार्म डिसेंबर १८०८ मध्ये २०० डॉलरला विकत घेतला होता. आता ही जागा एक राष्ट्रीय स्मारक म्हणुन जतन केली आहे. त्याचे वडील एका अशा बाप्टिस्ट चर्चचे सदस्य होते की जे मुख्य बाप्टिस्ट चर्चमधून गुलामगिरीला असलेल्या विरोधामुळे वेगळे झाले होते. यामुळे अब्राहम लिंकनला लहानपणापासुनच गुलामगिरीच्या विरोधाचे बाळकडू मिळाले होते. तो स्वतः मात्र वडीलांच्या अथवा इतर कोणत्याच चर्चचा सदस्य झाला नाही.

जमिनीच्या वादामुळे लिंकन कुटुंबाला त्यांच्या जमिनीवरून हलावे लागले. त्यांनी १८११ साली जवळच नॉब क्रीक येथे ३० एकर जमिन भाडेपट्टीवर घेतली व तेथे बस्तान हलविले. ही जमिन त्या भागातील उत्तम शेतजमिनींपैकी होती. या काळात लिंकनचे वडील हे एक सन्मान्य नागरीक व यशस्वी शेतकरी व सुतार होते. पुढे १८१५ साली जमिनीसंदर्भातील आणखी एका वादामुळे लिंकन कुटुंबाला या जमिनीवरूनही हलावे लागले. या सर्व त्रासास कंटाळून लिंकनच्या वडीलांनी इंडियाना राज्यात हलण्याचा निर्णय घेतला. या राज्यातील जमिनीचे केंद्र सरकारने सर्वेक्षण केले असल्याने येथील जमीनींचे कागदपत्र अधिक स्पष्ट व विश्वासार्ह होते. पुढे अब्राहम लिंकनने सर्वेक्षण व वकिली शिकण्यामागे कदाचित या घटनांचा परिणामही असण्याची शक्यता मानली जाते.

अखेर १८१६ साली, लिंकन सात वर्षाचा असताना त्याचे कुटुंब इंडियानामध्यी स्पेन्सर काउंटी येथे हलले. लिंकनने हा हलण्यामागे आर्थिक परिस्थिती व केंटकीमधील गुलामगिरीची पद्धत अशी दोन कारणे होती असे पुढे सांगितले आहे. लिंकन नउ वर्षाचा असताना १८१८ साली त्याच्या आईचा दुधातून होणाऱ्या विषबाधेच्या आजारपणामुळे मृत्यु झाला. लवकरच लिंकनच्या वडिलांनी सारा बुश जॉन्स्टन हिच्याशी दुसरा विवाह केला. लिंकनच्या सावत्र आईने त्याचा स्वतःच्या मुलासारखाच मायेने सांभाळ केला.

आणखी आर्थिक व जमिनीशी निगडीत अडचणींनंतर १८३० साल लिंकन कुटुंबीयांनी पुन्हा एकदा स्थलांतर केले व इलिनॉय राज्यातील मेकन काउंटी येथे सरकारी जमिनीवर बस्तान हलविले. पुढील वर्षी बावीस वर्षाच्या लिंकनने स्वबळावर जगण्याचे ठरविले व डेंटन ओफुट या व्यापाऱ्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्याचे काम न्यू सेलम ते न्यू ऑर्लिअन्स येथे बोटीने माल वाहून नेण्याचे होते. असे मानले जाते की या काळात त्याने न्यू ऑर्लिअन्स येथे गुलांमांचा लिलाव पाहिला व ही घटना त्याच्या मनात आयुष्यभर घर करून राहिली.

त्याचे शालेय शिक्षण केवळ १८ महिने विविध शाळांमध्ये फिरत्या शिक्षकांकडून झाले. परंतू त्याने हातात पडेल ते पुस्तक वाचण्याच्या सवयीमुळे स्वतःचे स्वतः बरेच शिक्षण मिळविले. बायबल, शेक्सपियरचे लेखन, व इंग्लिश आणि अमेरिकन इतिहासाचा त्याने खोलवर अभ्यास केला. याच काळात त्याने अतिशय साधी अशी वक्तृत्व शैली कमावली. या भाषाशैलीमुळे अवघड भाषेतील भाषणे ऐकण्याची सवय असलेल्या श्रोत्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसत असे. खाण्याकरितादेखील प्राणी मारण्याची कल्पना त्याला पसंत नसल्याने त्याने शिकार व मासेमारी यातही कधी रस घेतला नाही. त्याची शरीरयष्टी मजबूत व उंची भरपूर असुन तो उत्तम दर्जाचा लाकुडतोड्या व कुस्तीपटू होता.

[संपादन] व्यावसायिक जीवन

लिंकनने त्याच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ १८३० साली इलिनॉयच्या विधिमंडळाची निवडणूक लढून केला. या वेळी त्याचे वय २३ वर्षाचे होते. याच काळात त्याने इलिनॉयच्या सैन्यदलातही कॅप्टन म्हणून सेवा केली. या काळात त्याला युद्धास मात्र सामोरे जावे लागले नाही.

याच काळात त्याने बरेच लहान लहान व्यवसाय करण्याचे अयशस्वी प्रयत्नदेखील केले. त्याने दारू विकण्याचा परवाना घेऊन व्हिस्की विकली. याच काळात त्याने सर विल्यम ब्लॅकस्टोनच्या इंग्लिश कायद्यावरील भाष्य या चार खंडाच्या पुस्तकातील दुसरा खंड वाचला. या पुस्तकाने प्रभावित होउन त्याने स्वतःचे स्वतःच कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर १८३७ मध्ये त्याला इलिनॉय राज्यात वकिली करण्याची परवानगी मिळाली. याच वर्षी त्याने आपले बस्तान याच राज्यातील स्प्रिंगफील्ड गावी हलविले व स्टीफन टी. लोगन याच्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. लवकरच तो या राज्यातील प्रतिष्ठीत व यशस्वी वकिलांपैकी एक बनला व त्याची आर्थिक परिस्थितीदेखील सुधारली.

अब्राहम लिंकनने १८३४ पासुन इलिनॉय राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधी म्हणुन काम केले. याच काळामध्ये तो व्हिग पक्षाचा सभागृहातील नेता म्हणुनही काम केले. त्याने १८३७ मध्ये गुलामगिरीच्या प्रथेचा विधिमंडळात पहिला निषेध केला. या वेळेस त्याने या प्रथेस अन्यायकारक व चुकीचे धोरण असे म्हटले.

लिंकनने १८४१ साली विल्यम हर्नडॉन या व्हिग पक्षाच्या सदस्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. या दोघांनीही १८५६ नव्यानेच सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.

[संपादन] लग्न व अपत्ये

अब्राहम लिंकनने नोव्हेंबर ४, १८४२ रोजी ३३ वर्षाच्या वयात मेरी टॉड हिच्याशी विवाह केला. या दांपत्यास चार मुले झाली.

लिंकनचा अखेरचा वंशज, त्याचा पणतु, रॉबर्ट बेकविथ हा डिसेंबर २४, १९८५ रोजी मरण पावला.

Static Wikipedia 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu