डिसेंबर २१
Wikipedia कडून
<< | डिसेंबर २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | |||
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | ||
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | ||
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | ||
२८ | २९ | ३० | ३१ | |||||
२००८ |
डिसेंबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५५ वा किंवा लीप वर्षात ३५६ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सतरावे शतक
- १६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.
[संपादन] विसावे शतक
- १९१३ - आर्थर विनचे वर्ड क्रॉस, हे पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित.
- १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत.
- १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रॅंक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात.
- १९७९ - ऱहोडेशियाच्या स्वातंत्र्यासाठीच्या ठरावाचा मसुदा लंडनमध्ये ठरला.
- १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.
- १९८८ - लिब्यातील अतिरेक्यांनी पॅन ऍम फ्लाईट १०३ या बोईंग ७४७ जातीच्या विमानात लॉकरबी, स्कॉटलंड वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.
- १९९९ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ९५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली गाडी पकडली. तोरे पिकासो वरील हल्ला टळला.
- २००१ - देशावरील आर्थिक संकट आणि शहरांमधील दंगलींना जबाबदार ठरवून आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो दे ला रुआची हकालपट्टी.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १८०४ - बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८७९ - जोसेफ स्टालिन, १९२२ ते १९५३ पर्यंतसोवियेत युनियनचा नेता.
- १९४२ - हु जिन्टाओ, चीनचे नागरी गणतंत्रचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - क्रिस एव्हर्ट-लॉईड, ब्रिटीश टेनिस खेळाडू.
- १९६७ - मिखाइल साकाश्विलि जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] मृत्यू
- १२९५ - प्रोव्हेन्सची मार्गेरित बेरेन्जर, फ्रांसचा राजा लुई नववा याची राणी.
- १३०८ - हेसीचा हेन्री पहिला.
- १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती.
- २००४ - औतारसिंग पेंटल भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - (डिसेंबर महिना)