मे २३
Wikipedia कडून
मे २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४३ वा किंवा लीप वर्षात १४४ वा दिवस असतो.
<< | मे २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ||||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ||
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | ||
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | ||
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | ||
चैत्र/वैशाख शके १९३० |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
- १४३० - जोन ऑफ आर्कला बरगंडीच्या सैन्याने पकडले.
- १४९८ - गिरोलामो साव्होनारोलाला मृत्युदंड.
[संपादन] सोळावे शतक
- १५५५ - पॉल चौथा पोपपदी.
- १५६८ - नेदरलँड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य.
[संपादन] सतरावे शतक
- १६०९ - व्हर्जिनीयाचे दुसरे संविधान स्वीकृत.
[संपादन] अठरावे शतक
- १७०१ - समुद्री चाचा कॅप्टन विल्यम किडला फाशी.
- १७८८ - दक्षिण कॅरोलिनाने अमेरिकेचे संविधान स्वीकारले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०५ - नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.
- १८१३ - व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसैनिक सिमोन बॉलिव्हारच्या नेतृत्त्वाखाली क्रांतिकारकांनी मेरिदा शहर जिंकले. बॉलिव्हारला एल लिबर्तादोर (मुक्तिदाता) ही पदवी बहाल.
- १८४४ - सर्वप्रथम तार संदेश मोर्स कोडमध्ये पाठवण्यात आला. संदेश होता - व्हॉट हॅथ गॉड रॉट! (देवाने काय ठरवले आहे!).
- १८६३ - अमेरिकन गृहयुद्ध - उत्तरेच्या आरमाराने लुईझियानाच्या पोर्ट हड्सन या बंदराला वेढा घातला.
[संपादन] विसावे शतक
- १९११ - न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले.
- १९१५ - पहिले महायुद्ध - इटली दोस्त राष्ट्रांना सामील झाले.
- १९२३ - बेल्जियमच्या सबिना एरलाईन्सची स्थापना.
- १९३४ - अमेरिकन दरोडेखोर बॉनी पार्कर व क्लाईड बॅरो पोलिसांकडून ठार.
- १९३९ - चाचणीची सफर सुरु असताना अमेरिकेची पाणबुडी यु.एस.एस. स्क्वॉलस बुडाली. २६ खलाशी मृत्युमुखी. ३२ खलाशी, अधिकारी व १ प्रवाश्याला दुसर्या दिवशी वाचवण्यात आले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - नाझी अधिकारी हाइनरिक हिमलरने दोस्त राष्ट्रांच्या बंदिवासात आत्महत्या केली.
- १९४९ - पश्चिम जर्मनीचे राष्ट्र अस्तित्त्वात.
- १९५८ - अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला.
- १९७७ - नेदरलँड्समध्ये अतिरेक्यांनी रेल्वे गाडीतील प्रवाशांना धरले. अजुन एका गटाने शाळेतील १०० विद्यार्थ्यांना धरले.
- १९८४ - बचेंद्री पाल या भारतीय महिलेचे एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी पदार्पण.
- १९९५ - जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.
- १९९७ - मोहम्मद खातामी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी.
[संपादन] एकविसावे शतक
- २००१ - एव्हरेस्ट शिखर प्रथमच भारतीय लष्कराच्या पथकाकडून सर.
- २००४ - पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळाचा काही भाग कोसळला. ५ ठार. ३ जखमी.
[संपादन] जन्म
- १०५२ - फिलिप पहिला, फ्रांसचा राजा.
- ११०० - किन्झॉँग, चीनी सम्राट.
- १८४४ - अब्दुल बहा, बहाई धर्मगुरु.
- १८६५ - एपितासियो पेसोआ, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८९६ - केशवराव भोळे, मराठी संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, लेखक.
- १९१८ - डेनिस कॉम्प्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - पद्मराजन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- १९६३ - टोनी ग्रे, वेस्ट ईंडिझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - ग्रेम हिक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - यिगाल अमीर, इस्रायेलच्या पंतप्रधान यित्झाक राबिनचा मारेकरी.
[संपादन] मृत्यू
- ११२५ - हेन्री पाचवा, पवित्र रोमन सम्राट.
- १४९८ - गिरोलामो साव्होनारोला, ख्रिश्चन धर्मप्रसारक व फ्लोरेन्सचा राजा.
- १५२३ - अशिकागा योशिताने, जपानी शोगन.
- १५२४ - इस्माईल पहिला, इराणचा शहा.
- १८५७ - ऑगस्टिन लुई कॉशि, फ्रेंच गणितज्ञ.
- १९०६ - हेन्रिक इब्सेन, नॉर्वेचा लेखक.
- १९३४ - बॉनि पार्कर, अमेरिकन दरोडेखोर.
- १९३४ - क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.
- १९३७ - जॉन डी. रॉकफेलर, अमेरिकन उद्योगपती.
- १९४५ - हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी.