ई.स. १९६२
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ३ - जॉन तेविसाव्याने फिदेल कास्त्रोला वाळीत टाकले.
- जानेवारी ४ - न्यूयॉर्कमध्ये चालकरहित रेल्वे सुरू झाली.
- फेब्रुवारी २ - प्लुटो व नेपच्यून ग्रह ४०० वर्षांनी एका रेषेत.
- फेब्रुवारी ७ - अमेरिकेने क्युबाशी व्यापारी संबंध तोडले.
- फेब्रुवारी १७ - जर्मनीत हॅम्बुर्ग येथे हिमवादळ. ३०० ठार.
- फेब्रुवारी २० - जॉन ग्लेनने फ्रेंडशिप ७ या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.
- मार्च १ - अमेरिकन एरलाईन्स फ्लाईट १ हे विमान न्यूयॉर्कजवळ कोसळले.
- मार्च २ - म्यानमारमध्ये लश्करी उठाव.
- एप्रिल १४ - जॉर्जेस पॉम्पिदु फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- एप्रिल २६ - नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
- मे २२ - कॉन्टिनेन्टल एरलाईन्स फ्लाईट ११ या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानात बॉम्बस्फोट. ४५ ठार.
- मे ३१ - वेस्ट ईंडीझ संघाचे विघटन.
- जून २२ - एर फ्रांसचे बोईंग ७०७ जातीचे विमान वेस्ट ईंडीझमधील ग्वादालुपे बेटाजवळ कोसळले.
- जुलै ५ - अल्जिरीयाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- जुलै १० - टेलस्टार या जगातील पहिल्या संदेशवाहक उपग्रहाचे प्रक्षेपण.
- जुलै २० - कोलंबियात भूकंप. ४० ठार.
- डिसेंबर १४ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान.
[संपादन] जन्म
- जानेवारी ३० - अब्दुल्ला दुसरा, जॉर्डनचा राजा.
- मार्च २ - जॉन बॉन जोव्ही, अमेरिकन रॉक संगीतकार.
- मे १२ - एमिलियो एस्तेवेझ, अमेरिकन अभिनेता.
- सप्टेंबर २५ - राजू कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २७ - गॅव्हिन लार्सन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३० - कोर्टनी वॉल्श, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- एप्रिल १२ - सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
- मे ३ - नजीर अहमद, उर्दू कादंबरीचे जनक आणि उर्दू लेखक
- मे ५ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- मे ३१ - एडॉल्फ आइकमन, नाझी अधिकारी.