मार्च १
Wikipedia कडून
फेब्रुवारी – मार्च – एप्रिल | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२७ | २८ | २९ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
मार्च १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५९ वा किंवा लीप वर्षात ६० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] इ.स.पू. पहिले शतक
- इ.स.पू. ८६ - लुसियस कोर्नेलियस सुलाच्या नेतृत्त्वाखाली रोमन सैन्य अथेन्समध्ये घुसले व तेथील राज्यकर्ता ऍरिस्टियोनला पदच्युत केले.
[संपादन] सोळावे शतक
- १५६२ - फ्रांसमधील वासी शहरात कॅथोलिक जमावाने १,००हून अधिक हुगेनो व्यक्तिंना मारले.
- १५६५ - ब्राझिलमध्ये रियो दि जानेरो शहराची स्थापना.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०३ - ओहायो अमेरिकेचे १७वे राज्य झाले.
- १८१५ - एल्बाहून सुटका करून घेउन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.
- १८४० - ऍडोल्फ थियेर्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १८६७ - नेब्रास्का अमेरिकेचे ३७वे राज्य झाले.
- १८७२ - यलोस्टोन नॅशनल पार्क जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले.
- १८७३ - ई. रेमिंग्टन अँड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरूवात केली.
- १८९६ - अडोवाची लढाई - इथियोपियाच्या सैन्याने इटलीला हरवले.
- १८९६ - हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला.
[संपादन] विसावे शतक
- १९१२ - आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला.
- १९१८ - जर्मन पाणबुडीने रॅथलिन बेटाजवळ ईंग्लंडचे एच.एस.एस. कॅल्गारियन हे जहाज बुडवले.
- १९३२ - चार्ल्स लिंडबर्गचा मुलगा चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग तिसरा याचे अपहरण झाले.
- १९३६ - हूवर धरणाचे बांधकाम समाप्त.
- १९४१ - बल्गेरियाने जर्मनी व इटलीशी संधी केली.
- १९४६ - बँक ऑफ ईंग्लंडचे राष्ट्रीयकरण.
- १९४९ - इंडोनेशियाने जावा बेटावरील योग्यकर्ता प्रांत बळकावला.
- १९५३ - जोसेफ स्टालिनला पक्षाघाताचा झटका.
- १९५४ - अमेरिकेने बिकिनी बेटावर अणूबॉम्बचा स्फोट घडवला. आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग फैलावले.
- १९६१ - अमेरिकेत शांति दलाची स्थापना.
- १९६१ - युगांडात निवडणुका.
- १९६२ - अमेरिकन एरलाईन्स फ्लाईट १ हे विमान न्यूयॉर्कजवळ कोसळले.
- १९७१ - पाकिस्तानच्या अध्यक्ष याह्या खानने नॅशनल असेम्ब्ली(संसद)ची बैठक अनिश्चित काळासाठी तहकूब केली.
- १९७८ - स्वित्झर्लंडमधील चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
[संपादन] एकविसावे शतक
- २००४ - मोहम्मद बह्र अल-उलुम इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००६ - तार्या हेलोनेन फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षपदी.
[संपादन] जन्म
- १८१० - फ्रेडरिक चॉपिन, पोलिश संगीतकार.
- १८८८ - इवार्ट ऍस्टील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१० - डेव्हिड निवेन, ईंग्लिश अभिनेता.
- १९१८ - होआव गुलार्ट, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२२ - यित्झाक राबिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- १९३० - कोइंबताराव गोपीनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - रिचर्ड मायर्स, अमेरिकन सेनापती.
- १९५० - शहीद इस्रार, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - बंदुला वर्णपुरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - वेन फिलिप्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - सज्जाद अकबर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - सलिल अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - संजीवा वीरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - आझम खान , पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - झहूर इलाही, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - अनिसुर रहमान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - शहीद आफ्रिदी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - तिलन तुषारा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ११३१ - स्टीवन दुसरा, हंगेरीचा राजा.
- १७९२ - लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १९९१ - एडविन लँड, अमेरिकन संशोधक.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- स्वांतत्र्य आंदोलन दिन - दक्षिण कोरिया.
फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - (मार्च महिना)