मार्च २८
Wikipedia कडून
फेब्रुवारी – मार्च – एप्रिल | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२७ | २८ | २९ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
मार्च २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८७ वा किंवा लीप वर्षात ८८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] नववे शतक
[संपादन] अठरावे शतक
- १७७६ - हुआन बॉतिस्ता दि आन्झाने सान फ्रांसिस्कोचा किल्ला बांधायला सुरुवात केली.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८५४ - क्रिमियन युद्ध - फ्रांसने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८६२ - अमेरिकन गृहयुद्ध-ग्लोरियेटा पासची लढाई - उत्तरेच्या सैन्याने दक्षिणेचे न्यू मेक्सिकोवरील आक्रमण रोखले.
[संपादन] विसावे शतक
- १९३० - तुर्कस्तानमधील कॉँस्टेन्टिनोपल व अंगोरा शहरांनी आपली नावे बदलून अनुक्रमे इस्तंबूल व अंकारा अशी ठेवली.
- १९३९ - स्पॅनिश गृहयुद्ध - जनरलास्सिमो फ्रांसिस्को फ्रँकोनो माद्रिद शहर जिंकले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध-केप माटापानची लढाई - अँड्रु ब्राउन कनिंगहॅमच्या नेतृत्त्वाखाली रॉयल नेव्हीने तीन इटालियन युद्धनौका व दोन विनाशिकांचा धुव्वा उडवला.
- १९७९ - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील थ्री माइल आयलंड अणुशक्ती केंद्रातील शीतक बंद पडला व त्यामुळे किरणोत्सर्गी पाणी वाफरुपे हवेतून पसरले.
- १९७९ - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान जेम्स कॅलाहानविरुद्ध अविश्वासाचा ठराव एका मताने मान्य झाल्यावर सरकार कोसळले व संसद विसर्जित केली गेली.
- १९९२ - भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
- १९९८ - सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
[संपादन] एकविसावे शतक
- २००५ - सुमात्रा बेटावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.७ तीव्रतेचा भूकंप.
- २००६ - फ्रांसमधील नवीन कामगार कायद्याविरुद्ध १०,००,००पेक्षा अधिक युनियन सदस्यांचे अनेक शहरात मोर्चे.
[संपादन] जन्म
- १६०९ - फ्रेडरिक तिसरा, डेन्मार्कचा राजा.
- १८५१ - बर्नार्दिनो माचादो, पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष.
- १८६८ - मॅक्झिम गॉर्की, रशियन लेखक.
- १८९२ - कार्नेली हेमन्स, फ्रेंच-बेल्जियन शरीरशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेता.
- १९१० - इंग्रीड, डेन्मार्कची राणी.
- १९३० - जेरोम फ्रीडमन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९४६ - अलेहांद्रो तोलेदो, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५३ - मेल्चियोर न्डाडाये, बुरुंडीचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६० - होजे मरिया नीव्ह्स, केप व्हर्देचा पंतप्रधान.
- १९६८ - नासिर हुसेन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १९३ - पर्टिनॅक्स, रोमन सम्राट.
- १२३९ - गो-तोबा, जपानी सम्राट.
- १२८५ - पोप मार्टिन चौथा.
- १९४१ - व्हर्जिनिया वूल्फ, इंग्लिश लेखिका.
- १९४२ - मिगेल हर्नान्देझ, स्पॅनिश कवी.
- १९६९ - ड्वाइट डी. आयझेनहॉवर, अमेरिकेचा ३४वा राष्ट्राध्यक्ष.
- १९९२ - आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.
- १९९७ - श्रीमती पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्ता, भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या
- २००० - शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्ञ आणि लेखक.
- २००६ - पीटर उस्तिनोव, ब्रिटीश अभिनेता.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- शिक्षक दिन - चेक प्रजासत्ताक, स्लोव्हेकिया.
मार्च २६ - मार्च २७ - मार्च २८ - मार्च २९ - मार्च ३० - (मार्च महिना)