New Immissions/Updates:
boundless - educate - edutalab - empatico - es-ebooks - es16 - fr16 - fsfiles - hesperian - solidaria - wikipediaforschools
- wikipediaforschoolses - wikipediaforschoolsfr - wikipediaforschoolspt - worldmap -

See also: Liber Liber - Libro Parlato - Liber Musica  - Manuzio -  Liber Liber ISO Files - Alphabetical Order - Multivolume ZIP Complete Archive - PDF Files - OGG Music Files -

PROJECT GUTENBERG HTML: Volume I - Volume II - Volume III - Volume IV - Volume V - Volume VI - Volume VII - Volume VIII - Volume IX

Ascolta ""Volevo solo fare un audiolibro"" su Spreaker.
CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
सचिन तेंडुलकर - विकिपीडिया

सचिन तेंडुलकर

Wikipedia कडून

भारतीय Flag
सचिन तेंडुलकर
भारत (IND)
चित्र:Cricket no pic.png
फलंदाजीची पद्धत उजखोरा फलंदाज
गोलंदाजीची पद्धत लेग ब्रेक गुगली (LBG)

ऑफ ब्रेक (OB)
उजव्या हाताने मध्यमगती (RM)

कसोटी सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
सामने १३५ ३८१
धावा १०६६८ १४७८३
फलंदाजीची सरासरी ५४.७० ४४.१२
शतके/अर्धशतके ३५/४३ ४१/७६
सर्वोच्च धावसंख्या २४८* १८६*
चेंडुOvers bowled ३३३० ७६८५
बळी ३८ १४७
गोलंदाजीची सरासरी ५०.६८ ४४.०२
एका डावात ५ बळींची कामगिरी
एका सामन्यात १० बळींची कामगिरी लागू नाही
सर्वोत्तम गोलंदाजी ३/१४ ५/३२
झेल/यष्टीचीत ८५/० ११५/०

As of फेब्रुवारी १४, इ.स. २००७
Source: Cricinfo.com

सचिन रमेश तेंडुलकर (जन्म: एप्रिल २४, १९७३) हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके यासारखे फलंदाजीतील अनेक विक्रम आहेत. शिवाय विस्डेनने आपल्या २००२ मधील लेखात सचिनला सर डॉन ब्रॅडमन [१] नंतर दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वश्रेष्ठ कसोटी फलंदाजाचा दर्जा दिला. त्याला १९९७-१९९८ मधील खेळासाठी राजीव गांधी खेलरत्न (भारतामधील खेळातील सर्वोच्च पुरस्कार) आणि १९९९ मध्ये पद्मश्री ह्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. १९९७ साली सचिनला विस्डेन वार्षिक क्रिकेटपटूचा बहुमान मिळाला.

अनुक्रमणिका

[संपादन] सुरुवातीचे दिवस

सचिन तेंडुलकरचा जन्म एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शिल्ड गेममध्ये ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८/१९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.

[संपादन] आंतरराष्ट्रीय कारकीर्द

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तानविरूद्ध कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वसिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. १८ डिसेंबरला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. वरील मालिकेनंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात (नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या) जॉन राईटने सचिनचा झेल पकडला ज्यायोगे सचिन जगातला सर्वात तरूण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या इंग्लंडच्या दौऱ्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकवले. परंतु ह्या काळात त्याच्याकडून फारश्या लाक्षणिक खेळ्या झाल्या नाहीत. तेंडुलकरला खरा सूर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो (बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध) मालिकावीर राहिला आहे.

सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक ९ सप्टेंबर, १९९४ साली कोलंबो, श्रीलंका येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली.

सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलीप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले.

१९९७ साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोच्च वार्षिक क्रिकेटपटू घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा १००० कसोटी धावा केल्या. ह्याची सचिनने १९९९, २००१ आणि २००२ साली पुनरावृत्ती केली.

तेंडुलकरच्या नावे एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे. हा पराक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे (१९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३). १९९८ साली त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही.

[संपादन] गोलंदाजी

तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ३७ बळी आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते. आणि बर्‍याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरतो. जरी त्याची गोलंदाजीची सरासरी ५० च्या वर असली, त्याला 'जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज' समजण्यात येते.[२][३][४]

अनेक वेळा[५] सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्वपूर्ण वाटा राहिला आहे. खालील सामन्यांमध्ये सचिनच्या गोलंदाजीची नोंद घेता येईल,

  • १९९७-९८ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या[६] मालिकेत कोची येथे ५ बळींची कामगिरी. २६९ धावांचे लक्ष्य समोर असताना ३१ व्या षटकात ऑस्ट्रेलियाची २०३/३ अशी मजबूत स्थिती होती. सचिनने १० षटकात केवळ ३२ धावा देऊन एम.जी.बेवन, एस.आर.वॉ, डी.एस.लेमन, टी.एम.मुडी आणि डी.एम.मार्टीन ह्यांना बाद करुन सामना भारताच्या बाजूने वळवला
  • १९९३ सालचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील हिरो कप उपांत्य सामन्यामधील शेवटचे षटक. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी एक षटक शिल्लक असताना ६ धावांची गरज होती. सचिनने त्या सामन्यात एकही धाव न देता तीन चेंडू टाकले व संपूर्ण षटकात केवळ तीन धावा देऊन भारताला सामना जिंकून अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत केली.[७]
  • शारजामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध[८] १० षटकांत ४/३४ ची कामगिरी केली. त्यामुळे विंडीजचा डाव १४५ धावांत आटोपला.
  • आय सी सी १९९८ मधील उपांत्यपूर्व फेरीमध्ये ढाक्कामध्ये त्याने १२८ चेंडूंत १४१ धावा केल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ बळी मिळवून भारताचा उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा मार्ग सुकर केला.

[संपादन] प्रसिद्ध खेळी

[संपादन] कसोटी क्रिकेट

धावा प्रतिस्पर्धी ठिकाण (वर्ष) निकाल
११९ नाबाद ईंग्लंड मॅंचेस्टर (१९९०) अनिर्णित
१४८ ऑस्ट्रेलिया सिडनी (१९९१-९२) अनिर्णित
११४* ऑस्ट्रेलिया पर्थ (१९९१-९२) ऑस्ट्रेलिया
१२२ ईंग्लंड बर्मिंगहॅम (१९९६) ईंग्लंड
१६९ दक्षिण आफ्रिका केप टाऊन (१९९६-९७) दक्षिण आफ्रिका
१५५ नाबाद ऑस्ट्रेलिया चेन्नई (१९९७-९८) भारत
१३६ पाकिस्तान चेन्नई (१९९८-९९) पाकिस्तान
१५५ दक्षिण आफ्रिका ब्लूमफॉँटेन (२००१-०२) दक्षिण आफ्रिका
१७६ वेस्ट इंडीझ कोलकाता (२००२-०३) अनिर्णित
२४१ नाबाद ऑस्ट्रेलिया सिडनी (२००४) अनिर्णित

* तेंडुलकर ह्या खेळीला - जी तो १८ वर्षाचा असताना डब्ल्यू ए सी ए च्या उसळत्या खेळपट्टीवर खेळली गेली होती - आपली सर्वोत्त्कृष्ट खेळी मानतो.

[संपादन] एकदिवसीय क्रिकेट

धावा प्रतिस्पर्धी ठिकाण (वर्ष) निकाल
९० [९] ऑस्ट्रेलिया मुंबई (१९९६ वि.च.+) ऑस्ट्रेलिया
१०४ झिम्बाब्वे बेनोनी (१९९७) भारत
१४३ ऑस्ट्रेलिया शारजा (१९९८) ऑस्ट्रेलिया
१३४ ऑस्ट्रेलिया शारजा (१९९८) भारत
१२४ झिम्बाब्वे शारजा (१९९८) भारत
१८६ नाबाद न्यूझीलँड हैदराबाद (१९९९) भारत
९८ पाकिस्तान सेंच्युरीयन (२००३ वि.च.) भारत
१४१ पाकिस्तान रावळपिंडी (२००४) पाकिस्तान
१२३ पाकिस्तान अहमदाबाद (२००५) पाकिस्तान
९३ श्रीलंका नागपूर (२००५) भारत

+वि.च.-विश्वचषक

[संपादन] कामगिरी

सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीचा आलेख
सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीचा आलेख

[संपादन] कसोटी क्रिकेट

तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतील ठळक कामगिरी,

  • विस्डेनतर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या (डॉन ब्रॅडमननंतरच्या) सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान [१][१०]
  • सर्वाधिक कसोटी शतकांचा (३५) विक्रम, जो आधी सुनील गावसकरच्या नावे होता (३४ शतके). हा विक्रम सचिनने दिल्लीमध्ये २००५ साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना नोंदवला.
  • सर्वाधिक क्रिकेट मैदानांवर खेळाचा विक्रम: सचिन आत्तापर्यंत ५२ मैदानांवर कसोटी क्रिकेट खेळलेला आहे. हा आकडा मोहम्मद अझहरुद्दीन (४८), कपिल देव (४७), इंजमाम उल-हक (४६) आणि वसिम अक्रम (४५) पेक्षा जास्त आहे.
  • सर्वात जलद १०००० धावा कसोटी सामन्यांमध्ये करण्याचा विक्रम: हा विक्रम ब्रायन लारा आणि सचिन ह्या दोघांच्या नावे आहे. दोघांनीही हा विक्रम १९५ डावांमध्ये केला.
  • एकूण कसोटी धावांमध्ये चौथा क्रमांक (१०,३२३).
  • सर्वोच्च फलंदाजीची सरासरी: ५५.७९. ही सरासरी कोणत्याही १०,००० धावा केलेल्या फलंदाजापेक्षा जास्त आहे.
  • सचिन हा १०,००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे.
  • त्याच्या नावे ३७ कसोटी बळी आहेत (डिसेंबर १४, २००५).
  • दुसर्‍या क्रमांकाचा जलद ९,००० धावा करणारा फलंदाज. (ब्रायन लाराने ९००० धावा १७७ डावांमध्ये केल्या, सचिनने १७९ डावांमध्ये ती कामगिरी केली).

[संपादन] एकदिवसीय क्रिकेट

तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ठळक कामगिरी:

  • सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम सचिन व सनत जयसुर्या यांच्या संयुक्त नावे.
  • सर्वाधिक (५०) वेळा सामनावीर बनण्याचा विक्रम.
  • सर्वाधिक (८९ वेगवेगळ्या) मैदानांवर खेळण्याचा विक्रम.
  • सर्वाधिक धावा (फेब्रुवारी १५, २००६ पर्यंत १४,१४६ धावा).
  • सर्वाधिक शतके (३९).
  • पुढील संघांविरुद्ध सर्वाधिक शतके: ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वे.
  • १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,००० धावांचे लक्ष्य प्रथम आणि सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज.
  • एकदिवसीय सामन्यांमध्ये १४,००० धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज.
  • १०० डांवांमध्ये ५० अथवा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज.
  • १०० हून अधिक बळी (फेब्रुवारी १५, २००६ पर्यंत १४१ बळी).
  • १०,००० पेक्षा अधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक फलंदाजीची सरासरी (मार्च १७, २००६ पर्यंत).
  • भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम (१९९९ साली न्यू झीलँडविरुद्ध केलेल्या १८६ धावा)
  • एका वर्षात १,००० अथवा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम. ही कामगिरी त्याने आत्तापर्यंत सहा वेळा केलेली आहे - १९९४, १९९६, १९९७, १९९८, २००० आणि २००३.
  • १९९८ साली त्याने १,८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम आत्तापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.
  • १९९८ साली त्याने ९ एकदिवसीय शतके झळकवली. इतकी शतके आत्तापर्यंत कोणत्याही फलंदाजाने व कोणत्याही एका वर्षात केलेली नाहीत.

विश्वचषक

  • विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक धावा (५९.७२ च्या सरासरीने १७३२ धावा).
  • २००३ सालच्या विश्वचषकामध्ये मालिकावीर.
  • २००३ सालच्या विश्वचषकामध्ये ६७३ धावा. ह्या कोणीही कोणत्याही एका विश्वचषकामध्ये केलेल्या धावांपेक्षा अधिक आहेत.

[संपादन] इतर

  • सचिन तेंडुलकर हा तिसऱ्या पंचाकडून धावचीत केला गेलेला पहिला फलंदाज आहे. हा निर्णय १९९२ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना देण्यात आला.
  • सचिन हा (१९९२ साली) यॉर्कशायर क्रिकेट कौंटी क्लबमध्ये खेळणारा पहिला परदेशी फलंदाज आहे.
  • विशेष म्हणजे, विस्डेनने सचिनच्या एकाही कामगिरीची नोंद सर्वोच्च १०० फलंदाजीच्या खेळ्यांमध्ये केलेली नाही.

[संपादन] सामनावीर पारितोषिके

[संपादन] कसोटी क्रिकेटमध्ये १० पुरस्कार

दिनांक विरुद्ध संघ स्थळ
ऑगस्ट ९ १९९० ईंग्लंड ओल्ड ट्रॅफोर्ड
फेब्रुवारी ११ १९९३ ईंग्लंड चिदंबरम स्टेडीयम
ऑक्टोबर २५ १९९५ न्यू झीलँड चिदंबरम स्टेडीयम
मार्च ६ १९९८ ऑस्ट्रेलिया चिदंबरम स्टेडीयम
जानेवारी २८ १९९९ पाकिस्तान चिदंबरम स्टेडीयम
ऑक्टोबर २९ १९९९ न्यू झीलँड सरदार पटेल स्टेडियम
डिसेंबर २६ १९९९ ऑस्ट्रेलिया मेलबोर्न क्रिकेट मैदान
फेब्रुवारी २४ २००० दक्षिण आफ्रिका वानखेडे स्टेडियम
ऑक्टोबर ३० २००२ वेस्ट इंडीज ईड्न गार्डन्स
जानेवारी २ २००४ ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान

[संपादन] आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५२ पुरस्कार

# दिनांक विरुद्ध स्थळ
१९९०-९१ श्रीलंका पुणे
१९९१-९२ वेस्ट ईंडीज शारजा
१९९१-९२ दक्षिण आफ्रिका कोलकाता
१९९१-९२ वेस्ट ईंडीज मेलबोर्न
१९९१-९२ पाकिस्तान सिडनी
१९९१-९२ झिम्बाब्वे हॅमिल्टन, न्यूझीलंड
१९९३-९४ न्यूझीलंड ऑकलंड
१९९४ ऑस्ट्रेलिया कोलंबो
५० मार्च १६ २००४ पाकिस्तान रावळपिंडी
५१ जुलै २१ २००४ बांगलादेश सिंहली स्पोर्टस क्लब मैदान
५२ सप्टेंबर १४ २००६ वेस्ट ईंडीज कुआलालंपूर[११]

[संपादन] पाकिस्तानविरुद्धची कामगिरी

भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सचिनची कामगिरी हा नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंवर नेहमीच दडपण असते आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत खेळाडू आपल्या खेळाचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करतात असे समजले जाते.

तेंडुलकर आत्तापर्यंत पाकिस्तानशी १६ कसोटी सामने खेळला आहे. ह्या सामन्यांमध्ये त्याने ३९.९१ च्या सरासरीने ९१८ धावा केल्या आहेत. त्याच्या एकूण सरासरीपेक्षा (५५.३९) ही सरासरी कमी आहे. पाकिस्तानविरुद्धचा त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या १९४; ही सुद्धा त्याच्या एकंदरीत सर्वोच्च धावसंख्येपेक्षा (२४८) कमी आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनची कामगिरी त्यामानाने चांगली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या ६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.५८ च्या सरासरीने २१२२ धावा केल्या आहेत. त्याच्या एकंदरीत एकदिवसीय सामन्यांची सरासरी ४४.२० आहे.

[संपादन] टीका आणि अलीकडील कामगिरी

विस्डेनने आपल्या २००५ सालच्या अंकात सचिनबद्दल पुढील वक्तव्य केले, मुंबईच्या खेळपट्टीवरील सचिनची ५५ धावांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी सोडली, तर सचिनची २००३ नंतरची फलंदाजी पाहणे हा तितकासा उत्कंठावर्धक अनुभव नव्हता. २००३ सालानंतर सचिनच्या फलंदाजीत राजेशाही, आक्रमक व जोशपूर्णवरून यांत्रिक व बचावात्मक असे स्थित्यंतर येत गेले.

वरील टीका सचिनच्या आत्ताच्या कामगिरीची तुलना त्याच्या १९९४-९९ काळाच्या कामगिरीशी करून (ज्यावेळेस सचिन खेळाच्या दृष्टीने ऐन तारुण्यात म्हणजे २० ते २५ वर्षे वयाचा होता अशावेळी) झालेली दिसते. तेंडुलकरला १९९४ साली ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजीसाठी सलामीला पाठवण्यात आले [१२]. त्यावेळी त्याने ४९ चेंडूंत ८२ धावा केल्या. ही सचिनच्या सुवर्णयुगाची नांदी होती. तिची परिणती १९९८-९९ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धडाकेबाज खेळामध्ये झाली. ह्या सचिनच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न गमतीत म्हणाला होता की सचिननामक फलंदाजीच्या झंझावाताची मला भयानक स्वप्ने पडतात. [१३].

भारताच्या १९९९ सालच्या पाकिस्तान दौर्‍यात सचिनचे पाठदुखीचे दुखणे उफाळून आले. ह्यात भारताला चेपॉकमधील सामन्यात सचिनने शतक झळकवले असतानाही ऐतिहासिक पराभव स्वीकारावा लागला. ह्यातच भरीस भर म्हणजे, १९९९ चे क्रिकेट विश्वकपचे सामने चालू असताना सचिनचे वडील, प्राध्यापक रमेश तेंडुलकर ह्यांचे निधन झाले. त्यानंतर मोहम्मद अझहरुद्दीनकडून कप्तानपद स्वीकारलेल्या सचिनचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेला. तिथे त्याच्या संघाला नुकतेच विश्वविजेतेपद पटकावलेल्या यजमान संघाकडून ३-० असा दारुण पराभव स्वीकारावा लागला[१४]. त्यानंतर तेंडुलकरने कप्तानपदाचा राजीनामा दिला आणि सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या कप्तानपदाची धुरा सांभाळली.

२००३ सालच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सचिनने ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा केल्या. ह्या खेळीमुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत झाली. ऑस्ट्रेलियाने ह्या मालिकेत विश्वचषकावर आपली मक्तेदारी कायम ठेवली असली तरी तेंडुलकरला मालिकावीरचा सन्मान मिळाला.

२००३-२००४ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानची मालिका अनिर्णित राहिली. ह्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात तेंडुलकरने सिडनीमध्ये द्विशतक झळकावले. १-१ अशाप्रकारे अनिर्णित राहिलेल्या ह्या मालिकेमध्ये राहुल द्रविडला मालिकावीराचा बहुमान मिळाला.

२००४ साली ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केला. त्यावेळी सचिनचे कोपराच्या हाडाचे (tennis elbow) दुखणे वाढले आणि त्याला पहिल्यांदाच पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले. मुंबईमधल्या कसोटी सामन्यात सचिनच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून आपली प्रतिष्ठा राखली. कारण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने चेन्नईमधील कसोटी सामना अनिर्णित ठेवून मालिका २-१ अशी खिशात घातली होती. हल्लीच तेंडुलकरला आपल्या दुखापत झालेल्या खांद्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. त्यामुळे त्याला २००६ मधील वेस्ट इंडीज दौर्‍यापासून सक्तीने दूर राहावे लागले.

सध्याच्या काळात, विस्डेनने म्हटल्याप्रमाणे, सचिनच्या खेळात पूर्वीसारखी आक्रमकता राहिली नाही. ह्याला सचिनचे वाढते वय कारणीभूत आहे का हा सचिनच्या सततच्या १७ वर्षे खेळाच्या दुखापतींचा परिणाम आहे, ह्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. १० डिसेंबर २००५ रोजी फेरोज शाह कोटला मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आपले उच्चांक नोंदवणारे ३५ वे कसोटी शतक झळकवून त्याने आपल्या चाहत्यांना खूष केले. परंतु त्यानंतरच्या भारताच्या पाकिस्तान दौर्‍यामध्ये त्याने तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ २१ च्या सरासरीने धावा जमवल्यावर सचिनच्या अलीकडच्या कामगिरीवर अनेकांनी शंका घेतली.

फेब्रुवारी ६ २००६ रोजी तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये आपले ३९ वे एकदिवशीय शतक झळकवले. सध्या तेंडुलकर सर्वोच्च एकदिवशीय शतके झळकवणार्‍यांपैकी दुसर्‍या स्थानावर असलेल्या सौरव गांगुलीपेक्षा १६ शतकांनी पुढे आहे. ह्या कामगिरीनंतर ११ फेब्रुवारीला त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवशीय सामन्यात जलद ४१ धावा जमवल्या आणि त्यानंतर १३ फेब्रुवारी २००६ ला लाहोरमध्ये प्रतिकूल परिस्थितीत सचिनने ९५ धावा केल्या. हा एक नेत्रसुखद फलंदाजीचा अनुभव होता.

मार्च १९ इ.स. २००६ रोजी आपल्या घरच्या वानखेडे खेळपट्टीवर ईंग्लंड्विरुद्ध तिसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २२ चेंडूंत केवळ १ धाव करून बाद झाल्यावर, प्रेक्षकातल्या एका गटाकडून तेंडुलकरविरुद्ध हुल्लडबाजी करण्यात आली[१५]. असा अपमान सचिनला त्याच्या खेळाबद्दल पहिल्यांदा बघावा लागला. अलबत, त्याच कसोटी सामन्यातील दुसर्‍या डावात फलंदाजीसाठी येताना सचिनचे प्रेक्षकांनी स्वागत केले. परंतु ह्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सचिनला एकही अर्धशतक करता आले नाही. शिवाय त्याच्या खांद्याच्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेमुळे त्याच्या भविष्यातील फलंदाजीच्या कामगिरीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जेफरी बॉयकॉटने (Geoffrey Boycott) सचिनच्या कामगिरीविषयी अतिशय परखड अशी प्रतिक्रिया दिली: "सचिन तेंडुलकर हा सध्या त्याच्या सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे...आता तो अजून दोन महिने संघाबाहेर बसणार असेल, तर मला असे वाटते की तो त्याच्या पूर्वीच्या देदीप्यमान कामगिरीला साजेसा खेळ करणे अशक्य आहे."[१६]

२३ मे इ.स. २००६ रोजी प्रायोजित तंदुरुस्तीची चाचणी न घेण्याचा निर्णय घेतल्यावर, सचिनने असे घोषित केले की तो कॅरिबियन बेटांच्या टूरला जाणार नाही. परंतु ऑगस्टमधील पुनरागमनाच्या दृष्टीने त्याने लॅशिंगस XI तर्फे पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्या पाच सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे १५५, १४७ (रिटायर्ड), ९८, १०१ (रिटायर्ड) आणि १०५ अशा १०० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आणि ह्या सर्व सामन्यांमध्ये त्याची धावसंख्या सर्वोच्च होती.

शेवटी जुलै २००६ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडुन (BCCI) असे घोषित करण्यात आले की, शिबिरात सामील झाल्यानंतर सचिनने आपल्या दुखापतींवर मात केली आहे आणि तो संघाच्या निवडीसाठी पात्र आहे.

सप्टेंबर १४ २००६ मधील सचिनच्या पुनरागमनाच्या सामन्यामध्ये त्याने वेस्ट ईंडीजविरुद्ध ४० वी शतकी खेळी करुन त्याच्या टीकाकारांची वाचा बंद केली. ह्या सामन्यात त्याने १४८ चेंडूंत १४१ धावा जरी केल्या असल्या तरी पावसामुळे व्यत्यय आल्यामुळे वेस्ट इंडीजने हा सामना ड-लु पद्धतीनुसार जिंकला. जानेवारी २००७ मध्ये सचिनने आपले ४१ वे शतक ७६ चेंडुंमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पूर्ण केले. तेंडुलकर आता सर्वोच्च एकदिवसीय शतकवीरांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा (सनथ जयसूर्या) १८ शतकांनी पुढे आहे. आहे[१७].

[संपादन] वैयक्तिक जीवन

काही वर्षापूर्वी मित्रांनी एकमेकांची ओळख करून दिल्यावर १९९५ साली सचिनचा विवाह आनंद मेहता ह्या गुजराती उद्योगपतींच्या अंजली नामक (व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असलेल्या) कन्येशी झाला. त्यांना सारा (जन्म: ऑक्टोबर १९९७) आणि अर्जुन (जन्म: २३ सप्टेंवर २०००) अशी दोन मुले आहेत. सचिन आपल्या सासूतर्फे चालवल्या जाणार्‍या अपनालय नामक मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत दरवर्षी २०० गरजू मुलांना आर्थिक अथवा इतर मदत करतो. प्रसारमाध्यमांमध्ये सचिनच्या ह्या कार्याविषयी पराकोटीची उत्सुकता असली तरी सचिन आपल्या ह्या कामांविषयी गोपनीयता बाळगणेच पसंत करतो. तेंडुलकर बरेचदा आपली फेरारी ३६० मॉडेना मुंबईमध्ये फिरण्यासाठी काढताना दिसला आहे. (ही गाडी त्याला फियाट कंपनीतर्फे मायकल शूमाकरच्या हस्ते भेट देण्यात आली. कस्टमने ह्या गाडीवरील करावर सूट दिल्यामुळे ह्या गाडीचे प्रकरण सचिनसाठी डोकेदुखी ठरले होते. शेवटी फियाटने कर भरून हे प्रकरण मिटवले.)

मागील
मोहम्मद अझहरुद्दीन
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९९६इ.स. १९९८
पुढील
मोहम्मद अझहरुद्दीन
मागील
मोहम्मद अझहरुद्दीन
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९९९इ.स. २०००
पुढील
सौरव गांगुली



क्रिकेटच्या कसोटी सामन्यांत ५०च्या वर धावांची सरासरी असलेले भारतीय फलंदाज
राहुल द्रविड | सुनील गावसकर | विनोद कांबळी | वीरेंद्र सेहवाग | सचिन तेंडुलकर


[संपादन] हेसुद्धा पहा

[संपादन] टीपणे

  1. १.० १.१ The Tribune http://www.tribuneindia.com/2002/20021214/sports.htm#4. Dec 14, 2002
  2. http://content-ind.cricinfo.com/ci/content/story/93592.html
  3. http://www.bangladeshobserveronline.com/new/2004/08/02/sports.htm
  4. http://www.cricket.org.pk/db/ARCHIVE/1998-99/IND_IN_NZ/SCORECARDS/IND_NZ_ODI1_09JAN1999_CI_MR.html]
  5. http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/2004-05/PAK_IN_IND/SCORECARDS/PAK_IND_ODI1_02APR2005.html
  6. http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/1997-98/OD_TOURNEYS/PTC/IND_AUS_PTC_ODI1_01APR1998.html
  7. http://usa.cricinfo.com/db/ARCHIVE/1993-94/OD_TOURNEYS/CAB/IND_RSA_CAB_ODI-SEMI1_24NOV1993_MR
  8. http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/1991-92/OD_TOURNEYS/WLSTPY/WI_IND_WLSTPY_ODI5_22OCT1991.html
  9. Cricinfo match report. World Cup, 1995/96, India v Australia 27 Feb 1996 http://www.cricinfo.com/link_to_database/ARCHIVE/WORLD_CUPS/WC96/WC96-MATCHES/GROUP-A/AUS_IND_WC96_ODI19_27FEB1996.html
  10. rediff.com http://www.rediff.com/cricket/2002/dec/13wisden.htm Tendulkar second-best ever: Wisden. Dec 14, 2002
  11. http://content-ind.cricinfo.com/dlfcup/engine/match/256607.html
  12. Cricinfo Ind v NZ Mar 27, 1994 match report http://www.cricinfo.com/link_to_database/ARCHIVE/1993-94/IND_IN_NZ/IND_NZ_ODI2_27MAR1994.html
  13. SportNetwork.net http://www.sportnetwork.net/main/s119/st62164.htm. Down Memory Lane - Shane Warne's nightmare. Nov 29, 2004
  14. Cricinfo match report AUS v IND 3rd Test 26-30 Dec 1999 http://aus.cricinfo.com/db/ARCHIVE/1999-2000/IND_IN_AUS/SCORECARDS/IND_AUS_T2_26-30DEC1999.html
  15. India Daily http://www.indiadaily.org/entry/sachin-tendulkar-booed-by-wankhede-crowd/ Mar 20, 2006
  16. The Hindu http://www.hindu.com/2006/03/23/stories/2006032304402100.htm Playing five bowlers weakens the batting Mar 23, 2006
  17. http://usa.cricinfo.com/db/STATS/ODIS/BATTING/ODI_MOST_100S.html

[संपादन] बाह्य दुवे


भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७
द्रविड | तेंडुलकर | आगरकर | धोणी | गांगुली | हरभजन | कार्तिक | खान | कुंबळे | १० पठाण | ११ पटेल | १२ सेहवाग | १३ युवराज | १४ उतप्पा | १५ श्रीसंत

Static Wikipedia (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu