ई.स. १९४५
Wikipedia कडून
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] जानेवारी-मार्च
- जानेवारी ९ - अमेरिकेने फिलिपाईन्समधील लुझोन वर हल्ला केला.
- जानेवारी १७ - रशियन सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सो काबीज केले. युद्धात शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालेले होते.
- जानेवारी १७ - रशियन सैन्य जवळ येताना पाहून नाझींनी ऑश्विझ काँन्सेन्ट्रेशन कॅम्प रिकामा करायला सुरूवात केली.
- जानेवारी २७ - दुसरे महायुद्ध - रशियाच्या सैन्याने ऑश्विझ काँसेन्ट्रेशन कॅम्प मुक्त केला. येथे नाझींनी अंदाजे १२,००,००० ज्यू व ईतर व्यक्तिंना मारले. पहा ज्यू स्मृति दिन. ७,५०० लोक जिवंत सुटले.
- जानेवारी ३० - दुसरे महायुद्ध - गोटेनहाफेन, पोलंडहून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन कियेलला निघालेले जहाज विल्हेम गुस्टलॉफ रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार.
- फेब्रुवारी १३ - दुसरे महायुद्ध - सोवियेत सैन्याने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट काबीज केली.
- फेब्रुवारी १४ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने जर्मनीच्या ड्रेस्डेन शहरावर तुफानी बॉम्बफेक केली व शहर बेचिराख केले.
- फेब्रुवारी १४ - चिली, इक्वेडोर, पेराग्वे व पेरू संयुक्त राष्ट्रात दाखल.
- फेब्रुवारी १४ - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट व सौदी अरेबियाचा राजा इब्न सौद यांच्यात बैठक. अमेरिका व सौदी अरेबियात राजकीय संबंध सुरू.
- फेब्रुवारी १६ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बटान परत मिळवले.
- फेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - ईवो जिमाची लढाई - काही अमेरिकन मरीन्स माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
- फेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केले.
- फेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
- फेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फॉर्झैम शहरा बेचिराख केले.
- फेब्रुवारी २४ - ईजिप्तच्या पंतप्रधान अहमद मेहेर पाशाची संसदेत कामकाज चालू असताना हत्या.
- मार्च ३ - दुसरे महायुद्ध - आत्तापर्यंत तटस्थ असलेल्या फिनलंडने जर्मनी, जपान व मित्रदेशांविरुद्ध युद्ध पुकारले
- मार्च ७ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीत रेमाजेन जवळचा ऱ्हाइन नदीवरचा पूल काबीज केला.
[संपादन] एप्रिल-जून
- एप्रिल ११ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बुखेनवाल्ड कॉँसेन्ट्रेशन कॅम्प मधून कैद्यांची मुक्तता केली.
- एप्रिल १२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टचा अध्यक्षपदी असताना मृत्यु. उपाध्यक्ष हॅरी ट्रुमनची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.
- एप्रिल १३ - जर्मनीच्या गार्डेलजेन शहरात १,०००हून अधिक राजबंदी व युद्धबंद्यांची हत्या.
- एप्रिल १८ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या १,०००हून अधिक विमानांनी बॉम्बफेक करून जर्मनीतील हेलिगोलँड हे बेट उद्ध्वस्त केले.
- एप्रिल २० - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीचे लीपझीग शहर काबीज केले.
- एप्रिल २५ - दुसरे महायुद्ध - मिलानमधून नाझींची हकालपट्टी.
- एप्रिल २७ - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने फिनलंडमधून पळ काढला.
- एप्रिल २८ - इटलीच्या स्वातंत्र्यसैनिकांनी बेनितो मुसोलिनीचा वध केला.
- मे २ - दुसरे महायुद्ध-बर्लिनची लढाई - सोवियेत संघाने बर्लिनचा पाडाव केला व जर्मन संसदेवर आपला झेंडा फडकवला.
- मे ३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने ल्युबेकच्या अखातात जर्मनीची कॅप आर्कोना, थीलबेक व डॉइचलँड ही जहाजे बुडवली.
- मे ४ - दुसरे महायुद्ध - जर्मनीत हॅम्बुर्ग जवळ नॉएनगामे कॉँसेन्ट्रेशल कॅम्पच्या बंदींची सुटका.
- मे ५ - दुसरे महायुद्ध - नेदरलँड्स व डेन्मार्कमधील जर्मनीच्या सैन्याने ब्रिटीश व केनेडियन सैन्यासमोर शरणागति पत्करली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - प्रागमध्ये जर्मन सैन्याविरुद्ध उठाव.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - मॉटहाउसेन कॉँसेन्ट्रेशन कॅम्पमधील कैद्यांची सुटका.
- मे ८ - दुसरे महायुद्ध-युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती. युरोपमधील युद्ध समाप्त.
- मे ८ - सेटीफची कत्तल - फ्रांसच्या सैन्याने अल्जिरियात हजारो नागरिकांना ठार मारले.
- मे ९ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने हरमान गोरिंगला पकडले.
- मे ९ - दुसरे महायुद्ध - नॉर्वेच्या सैन्याने व्हिडकुन क्विसलिंगला पकडले.
- मे ९ - दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने प्रागमध्ये प्रवेश केला.
- मे २३ - दुसरे महायुद्ध - नाझी अधिकारी हाइनरिक हिमलरने दोस्त राष्ट्रांच्या बंदिवासात आत्महत्या केली.
- जून ७ - नॉर्वेचा राजा हाकोन सातवा देशात परतला.
- जून २१ - दुसरे महायुद्ध - ओकिनावाची लढाई संपली.
- जून २६ - सान फ्रान्सिस्कोमध्ये संयुक्त राष्ट्रांचे संविधान जाहीर झाले.
[संपादन] जुलै-सप्टेंबर
- जुलै ५ - दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्सची जपानपासून सुटका.
- जुलै १७ - दुसरे महायुद्ध - पॉट्सडॅम संमेलनास सुरुवात.
- जुलै २६ - युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत लेबर पार्टीचा विजय. विन्स्टन चर्चिलने पंतप्रधानपदाचा राजनामा दिला.
- जुलै २८ - होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जुलै २८ - अमेरिकेचे बी.२५ प्रकारचे विमान न्यू यॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डींगच्या ७९व्या मजल्यावर आदळले. १४ ठार.
- जुलै ३१ - दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या पंतप्रधान पियरे लव्हालने दोस्त राष्ट्रांसमोर आत्मसमर्पण केले.
- ऑगस्ट २ - दुसरे महायुद्ध - पॉट्ट्सडॅम संमेलनाची सांगता.
- ऑगस्ट ७ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जपानच्या हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला सफल झाल्याचे जाहीर केले.
- ऑगस्ट ८ - सोवियेत संघाने जपानविरुद्ध युद्ध पुकारले व मांचुरियावर आक्रमण केले.
- ऑगस्ट ९ - जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.
- ऑगस्ट १५ - दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.
- ऑगस्ट १७ - ईंडोनेशियाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य.
[संपादन] ऑक्टोबर-डिसेंबर
- डिसेंबर ९ - जनरल पॅटन जर्मनीमध्ये अपघातात जखमी.
- डिसेंबर १५ - दुसरे महायुद्ध - जनरल डग्लस मॅकआर्थरने हुकुमनाम्याद्वारे जपानमधील शिंटो धर्माची राज्यधर्म म्हणूनची मान्यता काढूल घेतली.
- डिसेंबर २७ - २८ देशांनी जागतिक बॅंकेची स्थापना केली.
- डिसेंबर २७ - कोरियाची फाळणी.
[संपादन] जन्म
- फेब्रुवारी ६ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार.
- मे ३ - सादिक मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेटपटू.
- मे १७ - भागवत चंद्रशेखर, भारतीय क्रिकेटपटू.
- मे २३ - पद्मराजन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- जून ५ - अंबर रॉय, भारतीय क्रिकेटपटू.
- जून ७ - वुल्फगँग श्युसेल, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
- जून १९ - ऑँग सान सू की, म्यानमारची राजकारणी.
- जून २९ - चंद्रिका कुमारतुंगा, श्रीलंकेची राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १३ - ऍशली मॅलेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै २१ - बॅरी रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै २४ - अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती.
- जुलै २८ - जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार.
- ऑगस्ट १५ - बेगम खालेदा झिया, बांगलादेशची पंतप्रधान.
[संपादन] मृत्यू
- एप्रिल १२ - फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
- एप्रिल २८ - बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा.
- मे १ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.
- मे २३ - हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी.
- जुलै ५ - जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान.
- ऑगस्ट १० - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.
- डिसेंबर २१ - जनरल जॉर्ज पॅटन, दुसऱया महायुद्धातील युरोपमधील अमेरिकन सेनापती.