गुरू ग्रह
Wikipedia कडून
गुरू सूर्यापासुन पाचव्या स्थानाचा आणि सूर्यमालेमधील आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे. गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून यांसारख्या वायूंनी बनलेल्या मोठ्या ग्रहांना "जोवियन प्लॅनेट्स" ( jovian planets) असे म्हणतात.
अनुक्रमणिका |
[संपादन] सर्वसाधारण माहिती
गुरू ग्रह हा पृथ्वीवरून दिसणार्या आकाशातील चौथी ठळक वस्तू आहे. कधीकधी मंगळ गुरूपेक्षा जास्त ठळक दिसतो. गुरू ग्रहाचे वस्तुमान उर्वरित सर्व ग्रहांच्या एकत्रित वस्तुमानापेक्षा २.५ पट आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा ३१८ पट जास्त असून त्याचा व्यास पृथ्वीच्या ११ पट आहे आणि एकूण आकारमान पृथ्वीच्या १३०० पट आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा सूर्यमालेच्या उत्क्रांतीवर बराच प्रभाव आहे. उदाहरणार्थ सर्व ग्रहांच्या (अपवाद बुध ग्रहाची कक्षा) या गुरुच्या कक्षेशी मिळत्या जुळत्या आहेत, बरेचसे कमी परिभ्रमण कालावधी असणारे धूमकेतू हे गुरूभोवती परिभ्रमण करतात, लघुग्रह पट्ट्यामध्ये असणार्या किर्कवूड फटी (Kirkwood gaps) या गुरूमुळेच आहेत. सूर्यमालानिर्मितीनंतर उशिरा अंतर्ग्रहांवर झालेल्या अशनीवर्षावाला गुरू ग्रहच कारणीभूत आहे. काहीजण सूर्यमालेचे वर्णन सूर्य, गुरु व इतर तुकडे असे करतात. तर काहीजण त्याला सूर्यमालेचा झाडू म्हणतात.
गुरूसारखा प्रचंड ग्रह व तपकिरी बटू यांच्यातील सीमारेषा पुसट आहे. परंतु तपकिरी बटूचा वर्णपट विशिष्ट असा असतो. सध्याच्या व्याख्येनुसार एखाद्या वस्तूचे वस्तुमान जर गुरूच्या वस्तुमानापेक्षा १२ पट जास्त असेल जे की ड्युटेरियमचे ज्वलन चालू करायला पुरेसे असेल त्या वस्तुला तपकिरी बटू असे म्हणतात. जर वस्तुमान त्यापेक्षा कमी असेल तर त्या वस्तुला ग्रह म्हणतात. असे मानले गेले की गुरुचा व्यास त्याच्यात असणार्या वस्तुमानाच्या प्रमाणात आहे, त्यामध्ये अजुन वस्तुमानाची भर पडली असती तर गुरुत्वाकर्षणामुळे तो आकुंचन पावेल व तापमान प्रचंड वाढून तार्याची उत्पत्ती होईल. या विचारामुळे काही खगोलशास्त्रज्ञ त्याला एक अयशस्वी तारा म्हणतात. खरे तर गुरू ग्रह हा तारा होण्यासाठी अजून ७५ पट मोठा असायला हवा. लहानात लहान लाल बटू हा गुरूपेक्षा ३०% मोठा असतो. मजेशीर गोष्ट म्हणजे गुरूला जेवढी उष्णता सूर्यापासून मिळते त्याच्यापेक्षा जास्त उष्णता तो उत्सर्जित करतो. ही जास्तीची उर्जा "केल्विन-हेम्होल्ट्झ प्रक्रियेद्वारे तयार होते. या प्रक्रियेचा परिणाम म्हणून गुरू दर वर्षी काही मिलिमीटरने आकुंचन पावत आहे. पूर्वी जेव्हा तो तरूण व जास्त गरम होता तेव्हा तो आजच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. शनि ग्रह तर गुरूपेक्षा मोठा होता. शनिच्या कमी वस्तुमानामुळे कमी गुरुत्वबल व जास्त उष्णता असल्याने हे दोन्हीही ग्रह जास्त फुगले (आणि शनिच्या गाभ्यामध्ये कमी वस्तुमान असल्याने तो जास्त फ़ुगला). सर्वसाधारणपणे गाभ्यामध्ये जितके जास्त वस्तुमान असते तितका तो ग्रह आकाराने लहान असतो.
गुरू सूर्यमालेमध्ये सर्वात जास्त वेगाने परिवलन करतो. त्याचा परिवलन काळ हा दहा तासांपेक्षा किंचित कमी आहे. इतक्या जास्त वेगाने परिवलन केल्याने त्याच्या विषुववृत्तावर फुगवटा तयार झाला आहे जो की पृथ्वीवरुन साध्या दूरदर्शीमधून सहज दिसू शकतो. गुरू सदैव ढगांनी आच्छादलेला असतो. हे ढग अमोनियाच्या स्फटिकांपासून आणि अमोनियम हायड्रोसल्फेटपासून बनलेले असतात. या ग्रहावर कठीण असा पृष्ठभाग नाही. याच्यावर असणाऱ्या ढगांची घनता जसजसे केन्द्राकडे जावे तसतशी वाढत जाते. या ग्रहावरील सर्वात परिचीत अशी गोष्ट म्हणजे यावर असणारा लाल डाग (The Great Red Spot). हा डाग म्हणजे पृथ्वीच्या आकरपेक्षा मोठे वादळ आहे. हा डाग चार शतकांपूर्वी पहिल्यांदा कॅसिनी व रॉबर्ट हूक (Giovanni Cassini and Robert Hooke) यांनी पाहिला. याबाबतचे गणित असे दर्शविते कि हे वादळ आता शांत झाले असून तो डाग सदैव या ग्रहावर राहील. ई. स. २००० साली तीन लहान लाल एकत्र येउन "ओव्हल बीए" (Oval BA) नावाच्या मोठ्या डागात परिवर्तित झाले नंतर त्याला लाल रंग येउ लागला व तो आधिच्या लाल डागाप्रमाणेच दिसू लागला.
[संपादन] भौतिक गुणधर्म
[संपादन] ग्रहाची घडण
गुरु ग्रहाचा गाभा तुलनेने कमी खडकाळ किंवा कठिण आहे. हा गाभा धातूरुप हायड्रोजनने (Metallic Hydrogen) वेढला गेला आहे. त्याच्यासभोवती द्रवरुप हायड्रोजन असून त्याच्यापलीकडे वायुरुप हायड्रोजनचे आवरण आहे. हायड्रोजनच्या या सर्व अवस्थांमध्ये निश्चित अशी सीमा नाही त्या सर्व एकमेकांमध्ये जसजसे गाभ्याकडे जावे तसतशा वायु ते द्रव व द्रव ते घन याप्रमाणे हलकेच मिसळलेल्या आहेत.
[संपादन] वातावरण
अणूंच्या संख्येनुसार गुरुचे वातावरण ~९०% हायड्रोजन व ~१०% हेलियमने बनलेले आहे. गुरु ग्रहाचे वातावरणात मिथेन, पाण्याची वाफ, अमोनिया व खडक यांचे अंश आहेत. या व्यतीरिक्त कार्बन, इथेन, हायड्रोजन सल्फाईड, निऑन, ऑक्सिजन, फॉस्फिन व गंधक यांचेही अंश आहेत. बाह्य वातावरणात अमोनियाचे स्फटिकही आढळून आले आहेत. अवरक्त व अतिनील किरणांच्या सहाय्याने केलेल्या अभ्यासाने बेन्झिन व अन्य हायड्रोकार्बन यांचेहि अस्तित्व सापडले आहे. हे वातावरण शनी ग्रहाशी अत्यंत मिळते जुळते आहे. पण युरेनस व नेपच्युन यांचे वातवरण मात्र थोडे वेगळे आहे, त्यांच्यामध्ये हायड्रोजन व हेलियमचे प्रमाण कमी आहे.
[संपादन] तांबडा राक्षसी डाग
हा तांबडा डाग म्हणजे गुरुच्या पृष्ठभागावरील प्रचंड मोठे वादळ आहे.
[संपादन] नैसर्गिक उपग्रह
गुरू ग्रहाला एकंदर ६३ नैसर्गिक उपग्रह आहेत. त्यांपैकी ठळकपणे दिसणारे चार उपग्रह गॅलिलियन उपग्रह म्हणून ओळखले जातात -
[संपादन] मानवनिर्मित उपग्रहांनी लावलेले शोध
[संपादन] जीवसृष्टीची शक्यता
गुरूवर जीवसृष्टी असणे शक्य नाही कारण तेथील वातावरणात पाणी नगण्य आहे आणि गुरुचा स्थायू पृष्ठभाग प्रचंड दाबाखाली आहे. १९७६ मध्ये व्हॉयेजर यान सोडण्याआधी कार्ल सागन यांनी अमोनियावर आधारित जीव गुरूवर असण्याची कल्पना मांडली होती; पण यासंबंधी कोणताही पुरावा सापडला नाही.
[संपादन] ट्रोजन लघुग्रह

गुरुच्या चंद्रांप्रमाणेच गुरुचे गुरुत्वाकर्षण बल बर्याच लघुग्रहांना नियंत्रणात ठेवते. हे लघुग्रह गुरूच्या सूर्याभोवतीच्या कक्षेत पुढील व मागील लाग्रांजियन बिंदूंच्या भागात पसरले आहेत. यांना 'ट्रोजन लघुग्रह' असे संबोधले जाते. इलियाड या प्राचीन ग्रीक महाकाव्याच्या स्मरणार्थ यांचे वर्गीकरण ग्रीक आणि रोमन यांत करण्यात आले आहे. यातील पहिला लघुग्रह ५८८ अकिलीझ मॅक्स वुल्फ यांनी १९०६ साली शोधला. सर्वात मोठा ट्रोजन लघुग्रह ६२४ हेक्टर हा आहे.
[संपादन] धूमकेतूची धडक
जुलै १६ ते जुलै २२, १९९४ च्या दरम्यान शुमाकर-लेव्ही ९ धूमकेतूचे ९ तुकडे गुरूच्या दक्षिण गोलार्धात धडकले. गुरूच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि सूर्यमालेतील त्याच्या आतील स्थानामुळे गुरूवर इतर ग्रहांपेक्षा जास्त धूमकेतूंची धडक होते असे मानले जाते.