मे १२
Wikipedia कडून
मे १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३२ वा किंवा लीप वर्षात १३३ वा दिवस असतो.
एप्रिल – मे – जून | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ |
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० |
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ |
२८ | २९ | ३० | ३१ | १ | २ | ३ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] चौदावे शतक
- १३२८ - रोम येथे प्रतीपोप निकोलस पाचव्याचा राज्याभिषेक.
[संपादन] सोळावे शतक
- १५८८ - फ्रांसचा राजा हेन्री तिसऱ्याने पॅरिसमधून पळ काढला.
[संपादन] सतरावे शतक
[संपादन] अठरावे शतक
- १७८० - अमेरिकन क्रांति - ब्रिटीश सैन्याने चार्ल्स्टन, दक्षिण कॅरोलिना जिंकले.
- १७९७ - नेपोलियन बोनापार्टने व्हेनिस जिंकले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६२ - अमेरिकेचे सैन्य लुईझियानाच्या बॅटन रूज शहरात शिरले.
- १८६४ - अमेरिकन गृहयुद्ध-स्पॉट्सिल्व्हेनियाची लढाई - तुंबळ युद्धात उत्तर व दक्षिणेचे हजारो सैनिक मृत्युमुखी.
- १८७३ - ऑस्कार तिसरा स्वीडनच्या राजेपदी.
- १८८१ - ट्युनिसीया फ्रांसच्या आधिपत्याखाली.
- १८९० - ईंग्लंडमध्ये सर्वप्रथम काउंटी सामने सुरू. यॉर्कशायरने ग्लॉस्टरशायरला ८ गडी राखून हरवले.
[संपादन] विसावे शतक
- १९३२ - अपहरण झाल्यावर अडीच महिन्यांनी चार्ल्स लिंडबर्गचा मुलगा मृत अवस्थेत सापडला.
- १९३७ - जॉर्ज सहावा ईंग्लंडच्या राजेपदी.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - खार्कोवची दसरी लढाई.
- १९४२ - ज्यूंचे शिरकाण - ऑश्वित्झ कॉँसेन्ट्रेशन कॅम्पमध्ये १,५०० ज्यू व्यक्तिंना विषारी वायूने मारण्यात आले.
- १९४९ - शीत युद्ध - सोवियेत संघाने बर्लिनचा वेढा उठवला.
- १९५२ - प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.
- १९५२ - गजसिंग जोधपुरच्या राजेपदी.
- १९५८ - अमेरिका व कॅनडाने शत्रूपासुन एकमेकांचे रक्षण करण्याचा तह केला.
- १९६५ - सोवियेत संघाचे चांद्रयान लुना ५ चंद्रावर कोसळले.
- १९७५ - कंबोडियाच्या आरमाराने अमेरिकेचे एस.एस. मायाग्वेझ हे जहाज पकडले.
- १९७८ - झैरमध्ये अतिरेक्यांनी कोल्वेझी शहर जिंकले.
[संपादन] एकविसावे शतक
- २००३ - सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अल कायदाने बॉम्बस्फोट घडवले. २६ ठार.
[संपादन] जन्म
- १४०१ - शोको, जपानी सम्राट.
- १४९६ - गुस्ताव पहिला, स्वीडनचा राजा.
- १६७० - फ्रेडरिक ऑगस्टस पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १८२० - फ्लॉरेन्स नाईटेंगेल, आधुनिक शुश्रुषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका.
- १८६७ - ह्यु ट्रम्बल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८८९ - ऑट्टो फ्रँक, जर्मन लेखक.
- १८९९ - ईंद्रा देवी, भारतीय योगी.
- १९०७ - कॅथेरिन हेपबर्न, अमेरिकन अभिनेत्री.
- १९२५ - योगी बेरा, अमेरिकन बेसबॉलपटू.
- १९३३ - नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ नंदू नाटेकर, अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू.
- १९६२ - एमिलियो एस्तेवेझ, अमेरिकन अभिनेता.
- १९६६ - स्टीवन बाल्डविन, अमेरिकन अभिनेता.
- १९७८ - थॉमस ओडोयो, केन्याचा क्रिकेटपटू.
[संपादन] मृत्यू
- १००३ - पोप सिल्व्हेस्टर दुसरा.
- १०१२ - पोप सर्जियस चौथा.
- १३८२ - जोन पहिली, नेपल्सची राणी.
- १८८९ - जॉन कॅडबरी, ईंग्लिश उद्योगपती.