गडचिरोली जिल्हा
Wikipedia कडून
गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्वेस असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४४१४ चौ.कि.मी आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या ९,७०,२९४ आहे. साक्षरता ६०.१% तर आदीवासी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ३८.३% आहे. गडचिरोली जिल्हा तुलनेने मागास आहे व आदीवासी भाग म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात गोंड, माडिया, कोलम व परधान या आदीवासी जमाती वास्तव्यास आहेत. आदीवासी वनांच्या आतल्य भागात राहतात. त्यांच्या देवाचे नाव 'पारसा पेण' आहे. रेळा व ढोल नाच, दिवाळी व होळी हे त्यांचे मुख्य उत्सव आहेत.
जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७९.३६% भाग वनांनी व्यापला आहे. जिल्हा बांबू व तेंदू पानांसाठी प्रसिध्द आहे. तांदूळ हे प्रमुख शेती-उत्पन्न आहे तर ज्वारी, तेलबिया, तुर , गहू ही पीके देखिल घेतली जातात. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात कडक उन्हाळे व हिवाळे असतात.
भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहे पण मोठे उद्योग नाहीत. जिल्ह्यात मराठी व्यतिरीक्त गोंडी, माडिया, हिंदी, तेलगू, बंगाली व छत्तीसगडी या भाषादेखिल बोलल्या जातात. जिल्ह्यातील प्रमुख नदी ही गोदावरी आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील तालुके- गडचिरोली,धानोरा, चामोर्शी, मुळचेरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, वडसा, अरमोरी, कुरखेडा व कोर्ची. चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाचे ऐतिहासीक शिव मंदीर व चप्राळा येथील हनुमान मंदीर प्रसिध्द आहे.
डॉ.अभय व राणी बंग यांची सर्च (शोधग्राम, गडचिरोली) ही संस्था आदीवासींना आरोग्यसेवा पुरवतात. डॉ.प्रकाश आमटे यांची लोक-बिरादरी (हेमलकसा,भामरागड) संस्था देखिल आदीवासींना आरोग्य व सामाजिक सेवा पुरवते.
[संपादन] संदर्भ
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |