सोलापूर जिल्हा
Wikipedia कडून
सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिणेस स्थित आहे. सोलापूर जिल्ह्यायात पंढरपूर (महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द) व अक्कलकोट सारखी सुप्रसिध्द देवस्थाने आहेत. बार्शीतील भगवंत मंदीर देखिल प्रसिध्द आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत. जिल्ह्याबाबत विस्मयकारक बाब ही की स्वातंत्र्य-प्राप्तीच्या आधी सोलापूर(शहराने) तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे.
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४.६ कि.मि आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस उस्मानाबाद जिल्हा व अहमदनगर जिल्हा, पूर्वेस गुलबर्गा जिल्हा,(कर्नाटक), दक्षिणेस सांगली जिल्हा व बिजापूर जिल्हा (कर्नाटक) तर पश्चिमेस पुणे जिल्हा व सातारा जिल्हा आहे. सोलापूरातील सरासरी पर्जन्यमान ५४५.४ मी.मी (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३ आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.
सोलापूरात ११ तालुके आहेत- उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, मढा व करमाळा. सोलापूर शहरात कापड-गिरण्या व विडी उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत.
सोलापूरातील प्रमुख पीके- ज्वारी, गहू, चणे, तूर, ऊस व शेंगदाणे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- पंढरपूर, अक्कलकोट, नान्नज येथीक माळढोक अभयाराण्य
[संपादन] संदर्भ
सोलापूर जिल्हाबाबत महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |