सांगली जिल्हा
Wikipedia कडून
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र विभागात आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातारा जिल्हा व सोलापूर जिल्हा, पूर्वेस विजापूर जिल्हा (कर्नाटक), दक्षिणेस कोल्हापूर जिल्हा व बेळगांव जिल्हा तर पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा आहे.
सांगली जिल्हा कृष्णा व वारणा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ से. व कमाल ४२ से. या मध्ये असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मी.मी आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८६०१.५ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या २५,८३,५२४ इतकी आहे. सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा अशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे.
सांगली जिल्ह्यातील तालुके- शिराळा, वळवा, तासगांव, खानापूर, आटपाडी, कवठे महाकांळ, मिरज, पलुस, जत, कडेगाव
जिल्ह्यातील प्रमुख पीके- बाजरी, ज्वारी, गहू, तांदूळ, ऊस, भुईमूग, हळकुंड, सोयाबिन, द्राक्षे
सांगली जिल्ह्यातील काही प्रसिध्द व्यक्ती- चिंतामणराव पटवर्धन, विष्णूदास भावे, गोविंद बल्लाळ देवल, दादासाहेब वेलणकर, क्रांतिसिंह नाना पाटील, वि.स.खांडेकर, विजय हजारे, वसंतदादा पाटील (माजी मुख्यमंत्री). मंगेशकर कुटुंबीय सुमारे १४ वर्षे सांगलीत वास्तव्यास होती.
सांगली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे: श्री गणपती मंदीर, मिरजचा दर्गा, संगमेश्वर मंदीर (हरीपूर), प्रचितगड व चांदोली धरण/अभयारण्य, बत्तीस शिराळा, तासगांव येथील गणेश मंदीर, दांडोबा.
[संपादन] संदर्भ
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |