हिंगोली जिल्हा
Wikipedia कडून
हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोलीच्या उत्तरेस अकोला जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा, दक्षिण-पूर्वेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. जिल्ह्यात औंढा, बासमठ, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके समाविष्ट आहेत.
हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ कि.मी.२ आहे. एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे. गोंधळ, शाहिरी, भारुड, पोतराज व कळगीतुरा या लोककला जिल्ह्यात प्रसिध्द आहेत. ज्वारी व कापूस ही मुख्य पिके आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:
- औंढा नागनाथ- बारा ज्योतीर्लिंगांपैकी हे आठवे (आद्य) ज्योतीर्लिंग आहे.
- इतर: मल्लिनाथ दिगंबर जैन मंदीर (शिराड शहापूर), तुळजादेवी संस्थान, संत नामदेवांचे जन्मस्थान (नरसी).
[संपादन] संदर्भ
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |