जालना जिल्हा
Wikipedia कडून
जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा विभागात येतो. आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या १६,१२,३५७ इतकी आहे.
जिल्हा संकरीत बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारीत उद्योगांसाठी प्रसिध्द आहे. महिको, महिंद्रा, बेजो शितल या महत्वाच्या संकरीत बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे जालना जिल्ह्यातील आहेत. जालना जिल्ह्यातील तालुके- जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घणसवंगी परतूर, मांथा व जाफराबाद. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मी.मी इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खो-यात येतो. जिल्ह्याचा ७५% भाग खरिफ पीकांसाठी वापरला जातो ज्यातील ४०% रब्बी पीकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पीके आहेत. जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते महत्वाचे हॅंडलूम व पॉवरलूम हातमाग केंद्र आहे.
जिल्ह्यातील प्रसिध्द व्यक्ति- समर्थ रामदास स्वामी, जनार्दन मामा, बद्रीनारायण बारवळे, दासू वैद्य इत्यादी.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- राजूर येथील श्री गणेश मंदीर, अंबड येथील मत्स्योदारी देवी, जळीचा देव (जयदेववाडी).
[संपादन] संदर्भ
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |