मुंबई उपनगर जिल्हा
Wikipedia कडून
मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.
[संपादन] तालुके
मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली व अंधेरी हे तालुके असून लोकसंख्या ८५,८७,५६१ इतकी आहे. जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी असून त्याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. मिठी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.
[संपादन] पर्यटनस्थळे
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,मार्वे व मानोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ.
हे सुध्दा पहा
- मुंबई (शहर)
- मुंबई जिल्हा
[संपादन] संदर्भ
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |