यवतमाळ जिल्हा
Wikipedia कडून
यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३,५८४ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या २०,७७,१४४ इतकी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस वर्धा जिल्हा व अमरावती जिल्हा, पूर्वेस चंद्रपूर जिल्हा, दक्षिणेस आंध्र प्रदेश राज्य व नांदेड जिल्हा तर पश्चिमेस हिंगोली जिल्हा व वाशीम जिल्हा आहे. जिल्ह्यात वर्धा व पेनगंगा या प्रमुख नद्या आहेत.यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्वाचा कापूस-उत्पादक जिल्हा आहे.
जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, अंध, गौंड व प्रधान आणि कोलम या काही प्रमुख जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. जिल्ह्यात मराठी बरोबरच बंजारी, कोलमी इत्यादी भाषा बोलल्या जातात. यवतमाळ जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९६४.७ मी.मी आहे. जिल्ह्यात हातविणकाम (हॅडलूम) विडी, कागद, साखर, ग्रीनींग-स्पिनींग व तेल उद्योग असे अनेक छोटे व मोठे उद्योग आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाची पीके- कापूस, ज्वारी, भुईमुग, तुर-डाळ. जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो. जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तेथून लाकूड, बांबू, तेंडू, आपटा, हिरडा व मोह हे उपयोगी वस्तू मिळतात यवतमाळ, पूसद, वणी, डिग्रस,घटंगी, पांदरकवाडा, राळेगाव, उमरखेडम दारव्हा व नेर ही महत्वाची व्यापार केंद्रे आहेत.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- घंटी बाबा जत्रा (डिग्रस), रंगनाथ स्वामी जत्रा (वणी), इतर जत्रेची ठिकाणे- कळंब, घटंजी, माहूर, वणी, तपोणा, पूसद, महागाव, कळंब येथील चिंतामणी मंदिर, रंगनाथ स्वामीचें मंदीर (वणी)
[संपादन] संदर्भ
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |