अहमदनगर
Wikipedia कडून
अहमदनगर | |
जिल्हा | अहमदनगर |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ३,०२,५२४ २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२४१ |
टपाल संकेतांक | ४१४-xxx |
वाहन संकेतांक | MH-१६ |
निर्वाचित प्रमुख | श्री. संदीप भानुदास कोतकर (महापौर) |
प्रशासकीय प्रमुख | श्री. रमेश पवार (महानगरपालिका आयुक्त) |
संकेतस्थळ | अहमदनगर महानगरपालिकेचे संकेतस्थळ |
अहमदनगर शहर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सीना नदीच्या काठावर वसलेले आहे जे पुण्यापासून ईशान्येकडे साधारणपणे १२० कि.मी. वर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
इ.स.१४९४ रोजी अहमद शाह निझाम शाह यांनी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ अहमदनगर शहर वसवलं. मोगल बादशहा शाहजहानने इ.स.१६३६ रोजी अहमदनगर काबीज केले. इ.स १७५९ रोजी पेशव्यांनी अहमदनगर वर ताबा मिळवला तर १८१७ रोजी ब्रिटीशांनी अहमदनगरावर विजय मिळवला. शहरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत, ज्यामध्ये अहमदनगरचा किल्ला, रेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल समाविष्ट आहे.
[संपादन] भूगोल
अहमदनगरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे व समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मी. आहे.
[संपादन] प्रसिद्ध व्यक्ती
- संत ज्ञानेश्वर - यांनी अहमदनगरजवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहीली.
- साई बाबा - हे अहमदनगरजवळील शिर्डी ही कर्मभूमी असणारे संत होते.
[संपादन] वाहतूक व्यवस्था
अहमदनगर शहर हे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांशी रस्त्याने जोडले गेले आहे. मुंबई - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर शहरातून जातो, अहमदनगर हे पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नासिक, बीड या सर्व शहरांशी राज्य महामार्गांनी जोडले गेले आहे. महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या बसेस हे अहमदनगरला जोडणारे महत्वाचे माध्यम आहे.
दौड - मनमाड लोहमार्गावरील अहमदनगर हे महत्वाचे स्थानक आहे. येथून जाणार्या सर्व प्रवासी रेल्वेगाड्या अहमदनगरला थांबतात. अहमदनगरचे रेल्वे वेळापत्रक येथेपहा.
[संपादन] पर्यटन स्थळे
- विशाल गणपती मंदिर - हे मंदिर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे आणि नगरचे ग्रामदैवत म्हणुन प्रसिद्ध आहे.
- रेणुकामाता मंदिर (केडगांव) - हे मंदिर केडगाव येथे आहे. ते अहमदनगर रेल्वेस्थानकापासून साधारणपणे ३ कि.मी. आणि अहमदनगर बसस्थानकापासून साधारणपणे ५ कि.मी. वर आहे.
- भुईकोट किल्ला - १९४२ मधे येथे भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेव्हा त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक लिहीले.
- सिद्धटेक - येथील सिद्धिविनायक मंदीर हे अष्टविनायकापैकी एक आहे.
- शिर्डी - हे ठिकाण साईबाबा मंदीरासाठी प्रसिद्ध आहे.
- शनीशिंगणापूर - हे गाव शनीमंदीरासाठी प्रसिद्ध आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकानासुद्धा कुलुपे नाहीत. स्थानिक लोकांची अशी भावना आहे की शनीदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे येथे आजतागायत एकाही चोरीच्या घटनेची नोंद झाली नाही.
- हरीश्चंद्रगड - एक ऐतिहासिक किल्ला.
[संपादन] हे सुद्धा पहा
[संपादन] संदर्भ
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |