अकोला
Wikipedia कडून
अकोला | |
जिल्हा | अकोला |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | 0724 |
टपाल संकेतांक | 444001 |
वाहन संकेतांक | MH-30 |
अनुक्रमणिका |
[संपादन] अकोला शहर
अकोला शहर हे अकोला जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. मुंबई पासून ६०० कि.मी पूर्वेस असणारे अकोला हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागात येते. दैनिक देशोन्नती हे प्रसिध्द वृत्तपत्र अकोल्यात स्थापन झाले आहे. या शहराचे भौगोलिक स्थान २०.४६ उत्तर व ७६.५९ पूर्व आहे.(स्रोत - गुगल अर्थ) हे शहर मोर्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. ही नदी पुर्णा नदीची एक मुख्य उपनदी आहे.
[संपादन] अकोला जिल्हा
अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती या प्रशासकीय विभागात येतो.
अकोला जिल्ह्यात खालील सात तालुक्यांचा समावेश होतो.
अकोला, अकोट, तेल्हारा, मुर्तीजापुर, बाळापुर आणि पातुर
[संपादन] पर्यटन
अकोला जिल्ह्यात नरनाळा , अकोला, अकोट आणि बाळापुर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. अकोल्यातील राजराजेश्वर, गायगावचा श्री गणेश,वारी भैरवगड चा मारोती, काटेपुर्णाची चंडीकादेवी,पातुरची रेणुका माता ही भाविकांच्या आकर्षणाची मुख्य केंद्रे आहेत. संत गजानन महाराजांचे शेगांव येथून ५० किमी अंतरावर आहे.
[संपादन] हवामान
उष्ण व विषम तापमानाचा हा जिल्हा असून तापमान कक्षा जास्त आहे. त्यामुळे उन्हाळा अतिशय उष्ण तर हिवाळा अतिशय थंड असतो. जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा असून हा जिल्हा तापी- पुर्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. जिल्ह्यातील इतर नद्या - उमा , काटेपुर्णा, मोर्णा, शहानुर, मन, आस, विश्वामित्री, निर्गुणा, गांधारी, आणि वान. काटेपुर्णा, उमा आणि वान नदींवर धरण बांधण्यात आले आहे. ==
[संपादन] वाहतूक
मुंबई ते कोलकाता या मध्य रेल्वेमार्गातील अतिशय महत्वाचे जोडस्थानक आहे.तसेच अजमेर - पुर्णा या मीटर गेज मार्गावरील महत्वाचे जोडस्थानक आहे. जिल्ह्यातील इतर महत्वाचे जोडस्थानक म्हणजे मुर्तीजापुर. येथे अचलपुर - मुर्तीजापुर तसेच मुर्तीजापुर - यवतमाळ हा एक स्वतंत्र मार्ग मुख्य रेल्वेला मार्गाला जोडला जातो.
[संपादन] शेतीव्यवसाय
जिल्ह्यातील जमीन काळी, कसदार (रेगुर) आहे. मुख्य पीक कापूस व तेलबिया आहे. खरीप ज्वारी उत्पादनात अकोला जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक आहे.
[संपादन] इतर
पारस हे महाराष्ट्रातील महत्वाचे औष्णिक विद्युत केंद्र या जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यात आहे.
[संपादन] बाहेरील दुवे
![]() |
महाराष्ट्र राज्य |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |