गणित
Wikipedia कडून
अनुक्रमणिका |
[संपादन] गणितज्ञानातला "पाय"(π)
याबद्दलचा विस्तृत लेख येथे आहे.
ग्रीक भाषेतले अक्षर "पाय" "पाय x व्यासाची लांबी = परीघाची लांबी" ह्या वर्तुळासंबंधित समीकरणात रूढीने वापरण्यात येते आणि त्यात
पायची किंमत जवळ जवळ ३.१४१५९ आहे.
[संपादन] फर्मॅटचे "शेवटचे प्रमेय"
पिएर फर्मॅट (ई.स. १६०१ -१६६५) हे एक बुद्धिमान फ्रेंच गणिततज्ञ होते. वास्तविक कायदेशास्त्राच्या शिक्षणानंतर ते सरकारी नोकरीत
वकिलीचा व्यवसाय करत असत, पण गणितशास्त्राचा अभ्यास हा त्यांचा आवडता छंद होता.
" 'क्ष^न + य^न = ज्ञ^न'" ह्या 'साध्यासरळ' समीकरणात 'न' ह्या घाताची किंमत २ हून अधिक असा कुठलाही पूर्णांक असता
ते समीकरण पुरवणार्या 'क्ष', 'य', आणि 'ज्ञ' ह्या अव्यक्तांच्या पूर्णांकात कोणत्याही किंमती नाहीत" असे एक प्रमेय आपणच
मांडून "त्या प्रमेयाची एक खरोखर लक्षणीय सिद्धता मी शोधून काढली आहे, पण ह्या पानातली (छापील मजकुराभोवतीची) समासाची
जागा ती सिद्धता लिहायला अपुरी आहे" असेही फर्मॅटनी एका गणिताच्या पुस्तकात लिहून ठेवले होते!
फर्मॅट ह्यांच्या निधनानंतर वरचे प्रमेय "फर्मॅटचे शेवटचे प्रमेय" ह्या नावाने गणितशास्त्रात प्रसिद्धीला आले होते. १९९४ सालापर्यंत म्हणजे सुमारे
३३० वर्षे ते प्रमेय सिद्ध करण्याचे किंवा ते चूक असल्याचे सिद्ध करण्याचे जंगी प्रयत्न अनेक बुद्धिमान गणिततज्ञांनी केले होते, पण त्या प्रदीर्घ
काळात कोणालाही त्या प्रयत्नात यश मिळाले नव्हते! सरतेशेवटी आंड्र्यू वाइल्स ह्या ब्रिटिश गणिततज्ञांनी कित्येक वर्षे भगीरथ प्रयत्न करत
राहून १९९४ साली ते प्रमेय अचूकपणे सिद्ध केले!
काही काही लोकोत्तर बुद्धिमंतांच्या वेगेवेगळ्या ज्ञानशाखांमधल्या अशा प्रचंड भराऱ्या पहाण्यात परमेश्वरदर्शन घडते.
पिएर फर्मॅट, रेने देकार्त, आणि ब्लेस पास्कॅल हे तीन श्रेष्ठ फ्रेंच गणिततज्ञ समकालीन होते.
[संपादन] इतिहास
[संपादन] प्रसिद्ध गणिततज्ञ
- पिएर फर्मॅट
- रेने देकार्त
- ब्लेस पास्कॅल
- लिओनार्ड ऑइलर
- आंड्र्यू वाइल्स
[संपादन] संज्ञा
[संपादन] गणिताचे विभाग
गणिताचे खालील प्रमुख प्रकार आहेत.
-- [युक्लीडतत्त्वाधिष्ठित]
-- [युक्लीडतत्त्वानधिष्ठित]
-- [अनियमिताकृती]
अंकाधिष्ठित पॄथक्करण