संयुक्त राष्ट्रसंघ
Wikipedia कडून
संयुक्त राष्ट्रसंघ सं.रा.(युनो) ची स्थापना ई.स. १९४५ मधे झाली. सं.रा.च्या निवेदनानुसार, ही संस्था वेगवेगळ्या देशांमधे सरकारां दरम्यान आंतर-राष्ट्रीय कायदा, संरक्षण, आर्थिक विकास आणि सर्वांना समान अधिकार या बाबतीत संवाद साधण्यात मदत करते. स्थापनेच्या सुरवातीला या संस्थेचे ५१ देश सदस्य होते. सध्या (२००५ मधे) याचे १९१ देश सदस्य आहेत, ज्यामधे आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त स्वतंत्र देशांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय न्यूयॉर्क येथे आहे. वर्षातून ठरावीक सभेमधे यांच्या विशेष कार्यकारी संस्थाच्या कामकाजांवर मार्गदर्शन केले जाते व निर्णय घेतले जातात.
[संपादन] संयुक्त राष्ट्रसंघ खालिल संस्थांमार्फत मानव विकासाचे कार्य बघते:
- जागतिक स्वास्थ संस्था (WHO)
- जागतिक बॅंक / IMF
- UNEP
- UNDP
- UNESCO
- UNICEF
- UNHCR
[संपादन] हे लेखदेखील पहा
- जि ४ देश